मुंबई - महाराष्ट्रात पावसानं जोरदार हजेरी लावली असून सांगली आणि कोल्हापूरसारख्या शहरांत महापूराने हाहाकार माजवला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यानं पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. याच पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रितेश देशमुख आणि जेनिलिया धावून आले आहेत.
जेनिलिया आणि रितेशने मुख्यमंत्री मदत निधीत पुरग्रस्तांसाठी २५ लाखांचा चेक दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही रक्कम स्वीकारतानाचा रितेश आणि जेनिलियासोबतचा आपला फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांचे आभार मानले आहेत.
-
Thank you Riteish and Genelia Deshmukh for the contribution of ₹25,00,000/- (₹25 lakh) towards #CMReliefFund for #MaharashtraFloods !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
@Riteishd @geneliad pic.twitter.com/Y6iDng2epD
">Thank you Riteish and Genelia Deshmukh for the contribution of ₹25,00,000/- (₹25 lakh) towards #CMReliefFund for #MaharashtraFloods !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2019
@Riteishd @geneliad pic.twitter.com/Y6iDng2epDThank you Riteish and Genelia Deshmukh for the contribution of ₹25,00,000/- (₹25 lakh) towards #CMReliefFund for #MaharashtraFloods !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2019
@Riteishd @geneliad pic.twitter.com/Y6iDng2epD
दरम्यान पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मराठी कलाकार पुढे सरसावले आहेत. याशिवाय सामान्य नागरिकांनीही पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक गोष्टी आणि शक्य होईल तशी आर्थिक मदत केली आहे. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्र सध्या त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे.