मुंबई - बॉलिवूडमध्ये आजकाल गँगसटर ड्रामा, क्राईम थ्रिलर आणि अँग्री यंग मॅन सिनेमांची भर पडत असते. मात्र सत्तरच्या दशकात रोमान्स चित्रपटांचा ट्रेंड ऋषी कपूर यांनी सुरू केला होता. मुख्य प्रवाहातील बॉलिवूड चित्रपटाची गुणवत्ता ऋषी कपूरच्या मेहनतीने सुधारली यात शंकाच नाही.
ऋषी कपूर यांच्या चित्रीत केलेल्या सुमधुर गाण्यांनी युगानुयुगे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करेल. हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक हिरो किशोरवयात असतानाच केवळ कॅमेराने प्रणयरम्य वातावरण तयार करायला लागला होता. १९७० मध्ये वडिलांच्या मेरा नाम जोकर चित्रपटातून ऋषी यांनी अधिकृतपणे चित्रपटात प्रवेश केला होता.
बॉबी चित्रपटातील 'मैं शायर तो नहीं' (१९७३):
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'प्यार का नाम मैने सुना था मगर, प्यार क्या है ये मुझको नहीं थी खबर ....' अशा ओळी जेव्हा पौगंडावस्थेतील हिरो गातो तेव्हा त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. ऋषी कपूर यांच्या नायक म्हणून पदार्पणाच्या चित्रपटातील गाणे. डिंपल कपाडियासोबतची त्यांची जोडी आणि चित्रपट दोन्ही हिट झाले. यातील गाणीही लोकप्रिय झाली. 'मैं शायर तो नहीं' हे गाणे सर्वाधिक हिट झाले. आनंद बक्षी यांचे हे गीत शैलेंद्र सिंह यांनी गायले होते.
अमर अकबर अँथनी (१९७७) चित्रपटातील 'परदा है परदा':
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मनमोहन देसाई यांनी अमर अकबर अँथनी या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासाठी 'परदा है परदा' ही कव्वालीची जागा निवडली. नितू सिंग साकारत असलेल्या सलमा या व्यक्तीरेखेला प्रेमात पाडणारी ही कव्वाली आजही ठेका धरायला लावते.
'चांदनी ओ मेरी चांदनी' हे चांदनी चित्रपटातील गाणे (१९८९) :
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चांदनी हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्यातील ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रीत झालेले 'चांदनी ओ मेरी चांदनी' हे गाणेही हिट झाले.
सागर (१९८५) मधील 'चेहरा है या चांद खिला है':
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सागर हा ऋषी कपूर आणि डिंहल कपाडिया जोडीचा आणखी एक हिट चित्रपट. यात कमल हासनचीही महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटातील 'चेहरा है या चांद खिला है हे आर डी बर्मन यांनी संगीतबध्द केलेले आणि किशोर कुमार यांनी गायलेले गाणे सर्वाधिक लोकप्रिय झाले.
दिवाना (१९९२) मधील 'तेरी उम्मीद तेरा इंतजार':
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
ऋषी कपूर, दीव्या भारती आणि शाहरुख खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दिवाना या चित्रपटातील 'तेरी उम्मीद तेरा इंतजार' हे गाणे खूप गाजले. समीर यांनी लिहिलेले आणि कुमार सानूच्या सुंदर आवाजातील हे गाणे नदिम श्वण यांनी कंपोज केले होते.
दिवाना (१९९२) मधील 'सॉचेंगे तुम प्यार':
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या सिनेमात ऋषी कपूरने गायकाची भूमिका केली होती. शाहरुख खानचाही हा पहिलाच पदार्पणाचा चित्रपट होता. दिवंगत दिव्यां भारती या दोघांनीही अभिनय केला होता.
कर्ज चित्रपटामधील 'ओम शांती ओम' (१९८०):
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सुभाष घई यांचा कर्ज हा म्यूझिकल चित्रपट होता. यातील एक हसीना थी, ओम शांती ओम, दर्द-ए-दिल, मैं सोला बारस की असी अनेक गाणी ब्लॉकबस्टर ठरली होती. ऋषी कपूर आणि टीना मुनिम यांची यात जोडी होती.
हम किससे कम नहीं (१९७७) मधील 'बचना ए हसीनो':
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अनेक दशकानंतरही जेव्हा ऋषी कपूर यांच्या गाण्यांचा विचार होतो तेव्हा 'बचना ए हसीनो' या गाण्याचा प्राधान्याने विचार केला जातो. रणबीर कपूरनेही 'बचना ए हसीनो' या वडिलांच्या गाजलेल्या गाण्यावर याच नावाच्या शीर्षक असलेल्या चित्रपटात काम केले होते.
२०१८ मध्ये, ऋषी कपूरला पहिल्यांदा कर्करोगाचे निदान झाले होते, त्यानंतर ऋषी जवळपास एक वर्ष न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते. यातून बरे झाल्यावर सप्टेंबर २०१९ मध्ये ते भारतात परतले. तथापि, ल्युकेमियासोबतच्या पुन्हा लढाईनंतर ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल २०२० रोजी इरफान खान यांच्या निधनानंतर दुसर्या दिवशी निधन झाले.
हेही वाचा - बुध्दीजीवी लोक भारताची प्रतिमा खराब करीत आहेत - कंगना रणौत