नवी दिल्ली - वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे तयार केले आणि वयाची 20 वर्षे ओलांडण्यापूर्वी बप्पी लाहिरी ( Bappi Lahiri ) संगीत दिग्दर्शक बनण्याच्या उद्देशाने स्वप्नांची नगरी, मुंबईला गेले. एका दशकातच त्यांनी हिंदी चित्रपटांना एकदम नवीन आवाज दिला. जे 'डिस्को' म्हणून ओळखले जाऊ लागले.
'सुरक्षा' या अॅक्शन ड्रामा चित्रपटातील त्यांच्या छोट्या प्रयोगाने हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्रांतीची लाट आणली. जेव्हा त्यांची 'मौसम है गीत का' ही रचना आली तेव्हा त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये डिस्को संस्कृतीचा आदर्श ठेवला. त्या चित्रपटाच्या रातोरात मिळालेल्या यशाने आणि त्याच्या साउंडट्रॅकने मिथुन चक्रवर्तीला स्टार म्हणून लोकांसमोर सादर केले.
आलोकेश लाहिरी ( Alokesh Lahiri ) म्हणून जन्मलेले बप्पी हे 80 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय संगीतकार होते. 80 आणि 90 च्या दशकात बप्पीदांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. या दरम्यान ते 'डिस्को किंग' म्हणून प्रसिद्ध झाले. 'डिस्को डान्सर', 'नमक हलाल', 'डान्स डान्स', 'कमांडो' यांसारख्या एकापाठोपाठ एक हिट गाण्यांनी धमाल केली.
'हरी ओम हरी', 'रंभा हो', 'यार बिना', 'दे दे प्यार दे' आणि 'जवानी जान-ए-मन' यांसारख्या हिट गाण्यांनी बप्पीदा यांनी आपल्या संगीत मोहिनीची जादू सुरू ठेवली. त्यांनी भारतीय गाण्यांवर डिस्को बीट तर आणलीच पण आंतरराष्ट्रीय गाण्यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले. आपल्या डिस्को ट्यूनने क्रांती घडवून आणण्यासाठी बप्पीदा यांनी कशामुळे प्रेरणा मिळाली असे? त्यामागेही एक रंजक कथा आहे.
1979 मध्ये लाहिरी त्यांच्या किशोर मामासोबत (किशोर कुमार) अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी शिकागोच्या नाईटक्लबला दिलेल्या बेटीने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. जीवन बदलून टाकणाऱ्या त्या घटनेची आठवण करताना बप्पीदा म्हणाले होते, "क्लबमधील डिस्क जॉकीने सांगितले की तो डिस्को वाजवेल आणि त्याने सॅटर्डे नाईट फीव्हर गाणे वाजवले. मी ऐकले की ही तर एकदम थपिंग बीट आहे आणि मग ठरवले की मी त्याला भारतात घेऊन जाणार''. मात्र बप्पी लाहिरी यांनी हा नव्याने शोधलेला ट्यूनला थेट सादर केले नाही. ते आरामात स्वतःसाठी योग्य संधीची वाट पाहत होते आणि तो योग जुळून आला.
चित्रपट निर्माते रविकांत नागायच यांनी बप्पीदाला फोन केला आणि त्यांना एका नवीन मुलाची ओळख करुन दिली. तो मुलगा जॉन ट्रॅव्होल्टा आणि ब्रूस ली सारखा दिसत होता. बी सुभाष दिग्दर्शित चित्रपटात बप्पीदाला त्याच्यासाठी बीट बनवण्यास सांगितले होते, हा चित्रपट 'डिस्को डान्सर' होता आणि नवीन मुलगा दुसरा कोणी नसून मिथुन चक्रवर्ती होता.
बदलत्या काळानुसारही आपल्या संगीतात टिकून राहण्यावर बप्पीदांचा विश्वास होता. असे असले तरी जेव्हा नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद आणि जतिन-ललित यांनी चित्रपटांमध्ये सुरांचा ट्रेंड परत आणला तेव्हा डिस्कोचा ट्रेंड स्टाईलच्या बाहेर गेला. प्रेक्षकांच्या आवडीतील बदलाचे स्वागत करताना बप्पी म्हणाले, "ट्रेंड येतात आणि जातात, पण चांगले संगीत नेहमीच असते. सर्वोत्कृष्ट EDM निर्मिती देखील येथे असेल. जुनी गाणी आपण आजही त्याच उर्जेने आणि प्रेमाने गातो.''
अनादी काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत साहित्यिक चोरीचा प्रघात आहे. जर इंटरनेटचे आजच्यासारखेच वर्चस्व असते, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांना प्रेक्षकांनी पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यास सांगितले असते आणि बप्पीदाही त्यातलेच एक होते.
संगीतकार बप्पी वाहिरी यांनी त्यांच्या 'थोडा रेशम लगता है' या गाण्याचा काही भाग असलेल्या हिप-हॉप हिट 'अॅडिक्टिव्ह'ची विक्री रोखण्याचा प्रयत्न केल्याबद्दल डॉ ड्रे विरुद्ध खटला जिंकला. गंमत म्हणजे, लाहिरींवर जगभरातील हिट गाण्यांपासून "प्रेरित" असल्याचा आरोपही करण्यात आला. त्याच्या बचावात बप्पीदा नेहमी म्हणत असत की डिस्को हा प्रकार भारतीय नाही. म्हणून, जेव्हा तुम्हाला तो आवाज भारतात आणायचा असेल तेव्हा काही संदर्भ शोधावे वागतात आणि या प्रक्रियेत मूळ कामापासूनची प्रेरणा घ्यावीच लागते.
संगीतकार बप्पीदा केवळ ट्रेंडसेटिंग संगीतकार नव्हते तर त्यांच्या ट्रेडमार्क ड्रेसिंग शैलीसाठी एक फॅशन आयकॉन देखील होते. लहानपणापासूनच एल्विस प्रेस्लीचे निस्सीम प्रशंसक असलेले लाहिरी हे हिंदी संगीत उद्योगातील एक प्रतिष्ठित फॅशन व्यक्तिमत्त्व म्हणूनच स्मरणात राहतील.
हेही वाचा - Bappi Lahiri passes away : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन