मुंबई - अभिनेत्री रिचा चड्ढाने बॉलिवूडमधील घराणेशाही, कलाकाराचे विशेषाधिकार, बॉलिवूड इको सिस्टम, प्रचलित लो-डाउन गलिच्छ ट्रेंड या वादग्रस्त वादाला तोंड फोडले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिने इंडस्ट्रीमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतर्गत कृत्यांवर लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
रिचाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "असं म्हटलं जातंय की ही इंडस्ट्री आतले आणि बाहेरचे अशी विभागली गेली आहे. माझ्या मते हिंदी सिनेसृष्टीची इको सिस्टम ही चागले आणि वाईट लोक यांच्यात विभागली गेली आहे."
इंडस्ट्री कशी चालते याबद्दल बोलताना रिचा पुढे म्हणाली, "थोडावेळ इथे घालवल्यानंतर माझ्या सारखीला असे वाटते की ही इंडस्ट्री फूड चेनसारखी चालते. जेव्हा लोकांच्या लक्षात येते की एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नाही तेव्हा ते भांडतात. लोकही कमी बदमाश नाहीत. जेव्हा त्यांना वाटतं की या वाटेवरुन आपण एकटे जाऊ शकतो, तेव्हा ते आपल्या सहकाऱ्यांचा हात सोडून देतात."
रिचाने गुंडगिरीबद्दल लिहिले आहे की, "जेव्हा जेव्हा कोणी तुमच्यावर अत्याचार करते तेव्हा तुम्ही रागावले असता, परंतु जेव्हा तुम्ही त्याच्या अधीन राहून काम करता आणि तुम्ही त्याचा छळ करता तेव्हा तुम्हाला योग्य वाटते. हे असे स्थान आहे जेथे यश आणि अपयश उघडपणे पाहिले जाते. जेथे आपल्या वैयक्तिक जीवनावर देखील परिणाम होतो. कधीकधी चुकीच्या कारणामुळे कलाकार चर्चेत येतो."
रिचा पुढे लिहिते, "आतले लोकही दयाळू आणि उदार असू शकतात आणि बाहेरील लोकही गर्विष्ठ होऊ शकतात. जेव्हा मी स्वत: या क्षेत्रात नवीन होते तेव्हा बाहेरील व्यक्तींना असे वाटले की मी महत्त्वाची व्यक्ती नाही. असा सामना करणारी मी एकमेव नाही तर असे अनुभवणारे बरेच लोक आहेत."
"हा विषय ऐकून मला हसू येते. मी कोणत्याही स्टार किडचा द्वेष करीत नाही. आमच्याकडून अशी अपेक्षा का केली जाते. जर कोणाचे वडील स्टार असतील तर ... तोही जन्माला आलाय जसा आपला जन्म सामान्य कुटुंबात झालाय तसा. आपल्या आई वडिलांबद्दल आपल्याला लाज वाटते का, जो वारसा आपल्याला मिळालाय त्याची लाज वाटते? तर मग हे सर्व स्टार किड्सच्या बाबतीत का म्हटले जाते. माझ्या कारकिर्दीची माझ्या मुलांना लाज वाटेल काय?"
"मी आणि सुशांतने एकाच थिएटर ग्रुपपासून सुरुवात केली होती. त्या काळात मी अंधेरी वेस्टमध्ये दिल्लीहून आलेल्या मित्रांसोबत ७०० स्क्वेअर फुटाच्या अपार्टमेंटमध्ये शेअरींगमध्ये राहात होते. सुशांत मला घ्यायला यायचा आणि बाईकवर लिफ्ट द्यायचा. यासाठी मी खूप कृतज्ञ आहे.", असे तिने पोस्टमध्ये लिहिलंय.
रिचा चड्ढा सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते आणि सामाजिक, राजकिय विषयांवर ती नेहमी आपली रोखठोक मते मांडत असते.