मुंबई - प्रसिध्द शायर, कवी, आणि गीतकार राहत इंदोरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ७० वर्षीय इंदोरी यांना मध्य प्रदेशातील इंदूरमधील अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहत इंदोरी यांनी ही माहिती आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. त्यांनी लिहिलंय की, "कोव्हिडची प्राथमिक लक्षणे वाटल्यामुळे मी काल कोरोनाची चाचणी केली, याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी अरबिंदो रुग्णालयात भरती झाले आहे. या आजाराला हरवून लवकरच बरा होईन यासाठी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या घरच्या लोकांना फोन करु नका, माझ्या तब्येतीची माहिती तुम्हाला ट्विटर आणि फेसबुकवरुन मिळत राहील."
राहत इंदोरी ही उर्दू कवितेच्या शैलीतील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि बॉलिवूडमधील अनेक गाण्यांसाठीही त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी मुन्ना भाई एम.बी.बी.एस., मर्डर आणि इतर चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत.