ETV Bharat / sitara

‘बधाई दो' मधील 'अटक गया' गाणे झाले प्रदर्शित! - Rajkumar Rao latest news

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर अभिनित ‘बधाई दो’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि प्रतीक्षा आहे. त्याचा ट्रेलर आणि शीर्षक गीतातून चित्रपटातील गमतीशीर आणि मजेदार व्हिज्युअल्स प्रदर्शित केल्यानंतर, 'बधाई दो'च्या निर्मात्यांनी त्याचे दुसरे गाणे 'अटक गया' रिलीज केले आहे.

‘बधाई दो' मधील 'अटक गया' गाणे
‘बधाई दो' मधील 'अटक गया' गाणे
author img

By

Published : Feb 3, 2022, 5:07 PM IST

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर अभिनित ‘बधाई दो’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि प्रतीक्षा आहे. त्याचा ट्रेलर आणि शीर्षक गीतातून चित्रपटातील गमतीशीर आणि मजेदार व्हिज्युअल्स प्रदर्शित केल्यानंतर, 'बधाई दो'च्या निर्मात्यांनी त्याचे दुसरे गाणे 'अटक गया' रिलीज केले आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या अंत:करणाचा ठाव घेण्यात यशस्वी होईल. हे रोमँटिक गाणे वरुण ग्रोव्हरने लिहिले आहे, अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे आणि अरिजित सिंग आणि रुपाली मोघे यांनी ते गायले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सुंदर बीट्स, मधुर शब्द आणि सामर्थ्यशाली व्हिज्युअल्सच्या मिश्रणासोबत, हे गाणे सर्व प्रेमींसाठी एक परिपूर्ण सांगीतिक मेजवानी आहे. हे सुंदर गाणे उचंबळलेल्या भावना, मधुर क्षण आणि प्रमुख जोडीमधील केमिस्ट्री व्यक्त करते. हे गाणे शार्दुल आणि सुमीच्या अतरंगी लग्नाचे वर्णन करते आणि त्या भूमिका वठविल्या आहेत राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर या कलाकारांनी. या गाण्यासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करायला अनेकजण नक्कीच उत्सुक असतील.

झी म्युझिक वर असलेला संपूर्ण अल्बम अमित त्रिवेदी, तनिष्क बागची, अंकित तिवारी आणि खामोश शाह यांनी संगीतबद्ध केला आहे. या गाण्याचे बोल वरुण ग्रोवर, वायु, अनुराग भोमिया, अजीम शिराझी आणि अन्विता दत्त यांनी लिहिले आहेत. जंगली पिक्चर्सच्या 'बधाई दो' चे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले आहे, तर कथा, पटकथा लिहिली आहे अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी यांनी.

'बधाई दो' येत्या ११ फेब्रुवारी रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार असून झी स्टुडिओजद्वारे जगभरात वितरित करण्यात येणार आहे.

हेही वाचा - 'द ग्रेट इंडियन किचन' फेम मल्याळम अभिनेत्री ‘हवाहवाई’मधून करणार मराठीत पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.