मुंबई - अभिनेता अक्षय कुमारचा नवीन चित्रपट 'पृथ्वीराज' 21 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु भारतातील कोरोनाचे नवीन प्रकार ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
एका सूत्राने सांगितले की, “तुमच्याकडे एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे जो देशभरातील प्रेक्षकांना आवडेल, त्यामुळे तुम्ही एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही. सिनेमा हॉल प्रेक्षकांनी खचाखच भरलेला असताना 'पृथ्वीराज' प्रदर्शित झाला पाहिजे. हा चित्रपट आता रिलीज झाला तर त्याचा उद्देश पूर्ण होऊ शकणार नाही. आपण प्रतीक्षा केली पाहिजे कारण जेव्हा तो रिलीज होईल तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करेल. 'ओमायक्रॉनची परिस्थिती लक्षात घेऊन चित्रपटाची पुढील तारीख ठरवली जाईल.'
-
‘PRITHVIRAJ’ NOT ON 21 JAN… YRF NOT DECIDED ON NEW RELEASE DATE YET… #Prithviraj #AkshayKumar #YRF pic.twitter.com/dcIhskw0rf
— taran adarsh (@taran_adarsh) January 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">‘PRITHVIRAJ’ NOT ON 21 JAN… YRF NOT DECIDED ON NEW RELEASE DATE YET… #Prithviraj #AkshayKumar #YRF pic.twitter.com/dcIhskw0rf
— taran adarsh (@taran_adarsh) January 4, 2022‘PRITHVIRAJ’ NOT ON 21 JAN… YRF NOT DECIDED ON NEW RELEASE DATE YET… #Prithviraj #AkshayKumar #YRF pic.twitter.com/dcIhskw0rf
— taran adarsh (@taran_adarsh) January 4, 2022
भारतात ओमायक्रॉनची प्रकरणांमध्ये वाढ होत असताना कठोर नियम लागू करण्यात आले असून नवी दिल्लीतील सिनेमागृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्राने पुढे सांगितले की, 'प्रत्येकाला 'पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर पाहायचा आहे आणि त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
पृथ्वीराज या चित्रपटातून २०१७ मध्ये मिस वर्ल्ड बनलेली मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मानुषी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात सोनू सूद आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.
हेही वाचा - Javed Akhtar Defamation Case : कंगना रणौतला अंधेरी कोर्टाचा मोठा दिलासा