ETV Bharat / sitara

‘शेरनी’च्या ट्रेलरसोबत प्रदर्शन तारीखही झाली घोषित!

‘शेरनी’ हा चित्रपट आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असून त्यासोबतच चित्रपट १८ जून २०२१ ला प्रदर्शित होणार असण्याची घोषणाही केलीय. विद्या बालनचा फॉरेस्ट ऑफिसर लूक चर्चेत असून त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

'Sherni
‘शेरनी’
author img

By

Published : Jun 3, 2021, 3:04 PM IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला असताना भारतातील अनेक राज्यांत लॉकडाऊन लागला. परिणामी चित्रपटगृहे बंद करण्यात आली. काही चित्रपट जे प्रदर्शसाठी तयार होते आणि ज्यांनी चित्रपटगृहांत ते प्रदर्शित करण्याच्या तारखा घोषित केल्या होत्या, अशा आणि इतरही अनेक चित्रपटांना पुन्हा एकदा ओटीटीची कास धरावी लागली. टी-सीरिज आणि अबंडनशीया एन्टरटेन्मेंटने अमित मसुरकर दिग्दर्शित विद्या बालनच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शेरनी’ सुद्धा त्यामध्ये मोडतो. हा चित्रपट आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

टीझरद्वारे ‘शेरनी’ ची एक झलक सामायिक केल्यानंतर निर्मात्यांनी, टी-सीरिज आणि अबंडनशीया एन्टरटेन्मेंटने त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असून त्यासोबतच चित्रपट १८ जून २०२१ ला प्रदर्शित होणार असण्याची घोषणाही केलीय. विद्या बालनचा फॉरेस्ट ऑफिसर लूक चर्चेत असून त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात विद्या बालनबरोबर शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज कबी अशा बहुमुखी कलाकारांचा समावेश आहे.

दिग्दर्शक अमित मसुरकर म्हणाले, "शेरनी ही एक गुंतागुंतस्तरीय कहाणी आहे. ती मनुष्यप्राणी आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांचा शोध घेते. विद्या बालन ही मध्यम-स्तरीय वन अधिकारी म्हणून काम करते, जी अडथळे व दबाव असूनही, आपल्या कर्तव्यात कसूर करीत नाही. वातावरणात संतुलन टिकवून ठेवण्यासाठी ती तिचे काम करत राहते. तिच्याबरोबर काम करणे हा माझ्यासाठी एक उत्तम अनुभव होता. मला आशा आहे की अमेझॉन प्राइम व्हिडिओवर शेरनी प्रदर्शित झाल्यावर या कथेला विस्तृत आणि वैविध्यपूर्ण भारत आणि जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.”

विद्या बालन म्हणाली की, “हा चित्रपट एका संवेदनशील विषयावर आधारित आहे जो केवळ मनुष्य-प्राणी यांच्यातच नव्हे तर मानवांमध्येदेखील आदर, परस्पर समन्वय आणि सह-अस्तित्वाच्या विषयाला स्पर्श करतो. जेव्हा मी प्रथम शेरनी ची कहाणी ऐकली तेव्हापासून मला चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटू लागली. तसेच मी ज्या भूमिकेत आहे, त्यात विद्या ही मुखदुर्बल असली तरी बहुआयामी स्त्री आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओद्वारे हे अनोखे पात्र आणि कथा जागतिक प्रेक्षकांसमोर येणार आहे याचा मला आनंद होत आहे आणि हा चित्रपट त्यांना मंत्रमुग्ध करेल अशी आशा करते.”

निर्माते भूषण कुमार म्हणतात की, “आम्ही आमच्या खास चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यास उत्सुक आहोत. शेरनी हा सर्वात महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक आहे, ज्याचा मी एक भाग होणे हे ह्या काळाची गरज आहे असे मला वाटते. प्रेक्षकांनी याचा अनुभव घ्यावा यासाठी मी आतुर आहे.” निर्माते विक्रम मल्होत्रा म्हणाले, “शेरनीचा एक भाग असल्याचा मला अत्यंत अभिमान आहे आणि विद्या बालनबरोबरची ही अपारंपरिक प्रेरणादायक कहाणी अगदी उत्तम रूपात जगाने पहावी यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि अमित मसूरकर निर्मित, शेरनी १८ जून २०२१ ला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

हेही वाचा - कोविड नियम उल्लंघनासाठी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी वर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.