मुंबई - बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. सिद्धार्थने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनावर बॉलिवूड कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे.
माधुरी दीक्षित -
अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाली, की 'हे अविश्वसनिय आहे. याचा मला धक्का बसलाय. सिद्धार्थ शुक्ला कायम स्मरणात राहिल. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तुझ्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे'.
फराह खान -
दिग्दर्शक, निर्माती फराह खान म्हणाली, की 'यावर्षी आणखी काही वाईट घडायचे राहिले आहे का... प्रचंड धक्का बसलाय. सिद्धार्थ शुक्ला गेल्याचे अतिशय वाईट वाटत आहे. त्याच्या कुटुंबीयांना झालेल्या दुःखात सहभागी आहे'.
सोनू सूद -
अभिनेता सोनू सुद म्हणाला, की 'तो आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. त्याच्या कुटुंबीयांना देव हा धक्का सहन करण्याची शक्ती देवो. माझ्या मित्रा, मी तुला कधीही विसरु शकणार नाही'.
कियारा अडवाणी -
अभिनेत्री कियारा अडवाणी म्हणाली, की 'खरंच, हे खुप धक्कादायक आहे. सिद्धार्थ रेस्ट इन पीस. त्याच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी आहे'.
मनोज वाजपेयी -
अभिनेता मनोज वायपेयी म्हणाला, की 'ओ माय गॉड. हे खरोखरी धक्कादायक आहे. त्याच्या कुटुंबीयांचे आणि मित्रांचे दुःख व्यक्त करण्यास शब्दही अपूरे पडतील'.
अविका गौर -
अभिनेत्री अविका गौर म्हणाली, की 'सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने आपल्याला जबर धक्का बसला असून अद्याप त्यावर विश्वास बसत नाही. तो एक व्यक्ती म्हणून खूप चांगला होता. त्याच्या आत्म्याला शांती लाभो'.
रितेश देशमुख -
रितेश देशमुख म्हणाला, की 'सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या अकाली निधनाने आपल्याला धक्का बसला आहे. सिद्धार्थवर लाखो चाहते प्रेम करायचे, त्याच्या आत्म्याला शांती लाभो'.
अक्षय कुमार -
अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची वाईट बातमी समजली. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो पण अशा प्रकारचा हुशार व्यक्ती आपल्यातून निघून जाणं हे धक्कादायक आहे."
बिंदू दारा -
बिंदू दारा सिंह म्हणाला की, सिद्धार्थचा मृत्यू ही गोष्ट अजूनही पटत नाही. त्याच्या जाण्याने बॉलिवूडचे मोठं नुकसान झालं आहे. सुनिल ग्रोवरनेही सिद्धार्थच्या अचानक निघून जाण्यानं आपल्याला दु:ख झाल्याचं सांगितलं आहे.