'दंगल' चित्रपटातून प्रसिध्दीस आलेली अभिनेत्री जायरा वसिमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय आपल्या फेसबुकवर पोस्ट लिहून कळवला होता. यावर इंडस्ट्रीतून असंख्य प्रतिक्रिया आल्या. बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिने मात्र तिच्यावर टीका केली होती. मात्र आता रविनाने जायराची माफी मागत आपले ट्विट डिलीट केले आहे. तसेच तिला यश मिळावे यासाठी प्रार्थनाही केली आहे.
-
I wish her luck and strengthAfter seeing this,I now regret my first immediate tweet after reading her statement.Maybe she was forced to write what was unacceptable to people like me who love films,cinema,the industry, that I was born into.Deleting the tweet that now sounds harsh. https://t.co/Okcg3NrCFa
— Raveena Tandon (@TandonRaveena) July 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I wish her luck and strengthAfter seeing this,I now regret my first immediate tweet after reading her statement.Maybe she was forced to write what was unacceptable to people like me who love films,cinema,the industry, that I was born into.Deleting the tweet that now sounds harsh. https://t.co/Okcg3NrCFa
— Raveena Tandon (@TandonRaveena) July 1, 2019I wish her luck and strengthAfter seeing this,I now regret my first immediate tweet after reading her statement.Maybe she was forced to write what was unacceptable to people like me who love films,cinema,the industry, that I was born into.Deleting the tweet that now sounds harsh. https://t.co/Okcg3NrCFa
— Raveena Tandon (@TandonRaveena) July 1, 2019
जायरा वसिमवर काहींनी दबाव आणल्यामुळे तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा सध्या मीडियात आहे. तिने यापुढे चित्रपटात कधीच काम न करण्याचा निर्णय घेतलाय. ही बातमी वाचून रविना टंडनने ट्विट करीत जायराची माफी मागितली आहे. रविनाने ट्विटमध्ये लिहिलंय, ''जर हे सत्य असेल आणि या कारणामुळे ती दबावात असेल तर तिच्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. उग्र आणि कट्टरवादी लोकांच्या दबावामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला ? आपल्या स्वप्नांची पूर्ती करु पाहणाऱ्या अनेक तरुणांची ती प्रेरणा प्रेरणा आहे.''
रविना एवढ्यावरच थांबली नाही तर तिने जायरा वसिमसाठी एक वेगळे ट्विट केले आहे. त्यात ती लिहिते, ''मी हे सर्व पाहून तिच्या भविष्यासाठी प्रार्थना करते. माझ्या पहिल्या ट्विटबद्दल खूप वाईट वाटत आहे. तिच्या निर्णयानंतर मी ते लिहिले होते. दबावात लिहिलेला तिचा निर्णय माझ्यासारख्या सिनेसृष्टीवर प्रेम करणाऱ्या अनेकांना न पटणारा होता. मी माझे ट्विट डिलीट करीत आहे. मला आता ती खूप विचित्र वाटत आहे.''
रविनाने पहिल्यांदा जेव्हा जायराने चित्रपट व्यवसायाला कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ट्विट करुन संताप व्यक्त केला होता. रविनाने ट्विटमध्ये लिहिले होते, ''सर्वकाही (यश, प्रसिद्धी) दिल्यानंतरही अवघ्या दोन चित्रपटांची कारकिर्द असणारे या कलाविश्वाचे ऋणी नाहीत. तर, ठीक आहे. याने काहीच फरक पडत नाही. फक्त एकच इच्छा आहे, की त्यांनी अतिशय सुरेखपणे यातून काढता पाय घ्यावा आणि हे सर्व प्रतिकूल विचार स्वत:पुरताच सीमीत ठेवावेत', असं ट्विट तिने केलं आता रविनाने हे ट्विट डिलीट करीत याबद्दल माफी मागितली आहे.