मुंबई - प्रसिध्द अभिनेत्री रत्ना पाठक शाह पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत काम करणार आहेत. आगामी 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात त्या रणवीरच्या आईची व्यक्तीरेखा साकारतील.
रणवीर सिंग आणि रत्ना पाठक पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. या सिनेमात रणवीरच्या वडिलांची भूमिका बोमन इराणी करीत आहेत.
या चित्रपटाबद्दल बोलताना निर्माता मनिष शर्मा म्हणाले, ''जयेशभाई जोरदारमध्ये रत्ना पाठक काम करणार असल्यामुळे कास्टींगमध्ये अनमोल भर पडली आहे. विशेष म्हणजे रत्नाजींना नाटकातील मेंटॉर मानणारा दिव्यांग ठक्कर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.''
''रत्नाजींचे जयेशभाई जोरदारमध्ये रणवीर सिंगच्या आईची भूमिका करतील. त्यांचे रणवीरसोबतचे काही सीन्स सर्वात जबरदस्त सीन्स असतील.'', असेही शर्मा यांनी सांगितले.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रत्ना पाठक म्हणाल्या, काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक अभिनेता ( दिव्यांग ) स्क्रिप्ट घेऊन आला होता. आता कलाकार असे चित्रपटही बनवतात की पेचात पडायला होते. म्हणून मी सावध होते आणि स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली. मला खूप आवडली आणि मी वाचत गेले. ती कथा शेवटपर्यंत मनोरंजक होती. त्याच्यात एक संदेशही होता आणि त्याहीपेक्षा जास्त आवश्यक म्हणजे ह्रदयही होते.''