मुंबई - दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मोठा मुलगा बाबिल खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात त्याच्या वडिलांची काही दुर्मिळ छायाचित्रं आहेत. इरफान खान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथे अभिनयाचे प्रशिक्षण घेत असतानाचे हे फोटो आहेत.
या फोटोंमधील इरफान केवळ 20 वर्षांचे आहेत. यातील त्यांचे हावभाव अगदी मोठ्या पडद्यावर चित्रपट करत असल्यासारखेच आहेत. डीएसएलआर नसताना काढलेल्या या फोटोतही इरफानचे बोलके डोळे स्पष्ट दिसत आहेत. चित्रपट निर्माता असलेल्या बाबिलने या फोटोला 'एनएसडी' असं कॅप्शन दिलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यापूर्वीही बाबिलने इरफान यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ते पाणीपुरी खाताना दिसले होते. इरफान खान यांनी बुधवारी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक उत्तम कलाकार गमावला.