मुंबई - क्रिकेट आणि सिनेमाजगत यांचे नाते खूप जुने आहे. क्रिकेटर आणि बॉलिवूड सेलेब्रिटी नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात. आता आयपीएलचा नवा सिझन उद्यापासून सुरू होतोय. अशावेळी सर्वच क्रिकेटर मैदानात सराव करीत आहेत. मात्र अजिंक्य रहाणेला बॉलिवूड स्टार रणवीर सिंगने खास शुभेच्छा दिल्या आहेत.
टूर्नांमेंटसाठी ऑल द बेस्ट असे ट्विट करुन रणवीर सिंगने अजिंक्य राहणेला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
All the best for the tournament, Champ! 🏏👍🏽 @ajinkyarahane88 pic.twitter.com/3Mqr8BXjCp
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">All the best for the tournament, Champ! 🏏👍🏽 @ajinkyarahane88 pic.twitter.com/3Mqr8BXjCp
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 8, 2021All the best for the tournament, Champ! 🏏👍🏽 @ajinkyarahane88 pic.twitter.com/3Mqr8BXjCp
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 8, 2021
यापूर्वी अजिंक्य रहाणेने एक ट्विट करुन मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये रणवीर सिंग त्याला बोलींग करतानाची अॅक्शन करताना दिसतो तर त्याच्या चेंडूला हातात नसलेल्या बॅटने अजिंक्य षटकार मारतो, असा हा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.
अजिंक्यने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''हा गोलंदाज नक्कीच आगामी काळात माझ्या ११ विजयवीरांच्यामधील एक चेहरा असेल.''
-
Have definitely featured this bowlers name to feature in my 11 😉 @RanveerOfficial pic.twitter.com/ogJ4bWLXYt
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) April 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Have definitely featured this bowlers name to feature in my 11 😉 @RanveerOfficial pic.twitter.com/ogJ4bWLXYt
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) April 8, 2021Have definitely featured this bowlers name to feature in my 11 😉 @RanveerOfficial pic.twitter.com/ogJ4bWLXYt
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) April 8, 2021
आपल्याला माहिती असेल की रणवीर सिंग आगामी '83' या चित्रपटात क्रिकेटर कपील देवची भूमिका साकारतोय. यासाठी त्याला दस्तुरखुद्द कपील देवने गोलंदाजीचे प्रशिक्षण दिले होते. या व्हिडिओमध्ये तो कपील देवची बॉलिंग अॅक्शन करताना दिसतोय.
हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी'चा तेलुगु टिझर पवन कल्याणच्या 'वकिल साब'सोबत होणार रिलीज