मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून आतुरता असलेला रणवीर सिंगचा मल्टीस्टारर '८३' चित्रपट देखील पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीमकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता चाहत्यांना '८३' चित्रपटासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
'८३' हा चित्रपट १९८३ साली पार पडलेल्या विश्वचषकावर आधारित आहे. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली होता. कपिल देव यांनी १९८३ साली भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत संघाला विजय मिळवून दिला होता.
-
83 is not just our film but the entire nation’s film. But the health and safety of the nation always comes first. Stay safe, take care.
— Ranveer Singh (@RanveerOfficial) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We shall be back soon!
.@kabirkhankk @deepikapadukone @Shibasishsarkar #SajidNadiadwala @vishinduri @ipritamofficial @RelianceEnt pic.twitter.com/wS0Anl8BM2
">83 is not just our film but the entire nation’s film. But the health and safety of the nation always comes first. Stay safe, take care.
— Ranveer Singh (@RanveerOfficial) March 20, 2020
We shall be back soon!
.@kabirkhankk @deepikapadukone @Shibasishsarkar #SajidNadiadwala @vishinduri @ipritamofficial @RelianceEnt pic.twitter.com/wS0Anl8BM283 is not just our film but the entire nation’s film. But the health and safety of the nation always comes first. Stay safe, take care.
— Ranveer Singh (@RanveerOfficial) March 20, 2020
We shall be back soon!
.@kabirkhankk @deepikapadukone @Shibasishsarkar #SajidNadiadwala @vishinduri @ipritamofficial @RelianceEnt pic.twitter.com/wS0Anl8BM2
हेही वाचा -'इडा- पिडा दूर होऊ दे', कोरोनाशी लढण्यासाठी मुक्ताने कवितेतून दिला संदेश
चित्रपट निर्मात्यांनी एका पोस्टद्वारे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. हा चित्रपट आमचाच नाही, तर संपूर्ण देशाचा आहे. मात्र, सर्वांचे आरोग्य आणि सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या, सुरक्षित राहा, असे आवाहन टीमने प्रेक्षकांना केले आहे.
रणवीर सिंगने देखील ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा -'घाबरू नका, सरकारी नियम पाळा'... भारत गणेशपुरे यांचे आवाहन