मुंबई - सध्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण त्यांच्या आगामी '83' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत रणवीर-दीपिका 1983 च्या विश्वचषक विजेत्या टीमसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सौदी अरेबियाला पोहोचले. येथे चित्रपटाची टीम आणि सर्व खेळाडूंना मोठे सरप्राईज देण्यात आले. सौदी अरेबियाची बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे, ज्यावर 16 डिसेंबर रोजी '83' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रणवीर-दीपिकासह 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाने हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या '83'चा जेद्दाह (सौदी अरेबिया) येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता. यानंतर चित्रपटाची टीम दुबईला गेली. दिग्दर्शक कबीर खान पत्नी मिनी माथुरसोबत होते. या विशेष सोहळ्याला क्रिकेट जगतातील दिग्गज कपिल देव, सुनील गावस्कर आणि मोहिंदर अमरनाथ देखील उपस्थित होते.
जगातील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफावर भारताच्या क्रिकेटमधील ऐतिहासिक विजयावर बनलेला '83' चा ट्रेलर पाहून सर्वांचे डोळे ओलावले आणि सर्वांनाच अभिमान वाटला. त्यावेळी दीपिकाचेही डोळे ओले झाले. रणवीर-दीपिकाने हातात हात घालून हा सगळा सीन बारावलेल्या अवस्थेत पाहिला. यावेळी, या जोडप्याचे चाहते त्यांचे फोटोही काढत होते. ट्रेलर संपल्यानंतर, रणवीर-दीपिकासह उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून या आदरातिथ्याबद्दल आभार मानले.
रणवीर आणि दीपिकाने यावेळी रेट्रो लूक कॅरी केला होता. रणवीर सिंगने त्याचा लूक इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि लिहिले, 'डिस्को इन्फर्नो, चला जाऊया'.
रणवीर आणि दीपिका व्यतिरिक्त '83' चित्रपटात हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, साहिल खट्टर, अॅमी विर्क, आदिना कोठारे, धैर्य करवा, आर. बद्री आणि पंकज त्रिपाठी आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबरला रिलीज होत आहे.
हेही वाचा - ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट दक्षिणेतील भाषांमध्ये रिलीज होणार, 'बाहुबली' दिग्दर्शक राजमौलींची घोषणा!