ETV Bharat / sitara

'ब्लॅक'मध्ये काम करण्यास सुरूवातील 'नाखूष' होती राणी मुखर्जी!! - राणीला भूमिका झेपेल का याबद्दल शंका होती

अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या भूमिका असलेला संजय लीला भन्साळी यांचा ब्लॅक हा चित्रपट १६ वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राणीने आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक भूमिका साकारली होती. ही भूमिका करण्यास सुरुवातीला ती नाराज होते असे तिने म्हटलंय.

Rani Mukerji
राणी मुखर्जी
author img

By

Published : Feb 4, 2021, 12:58 PM IST

मुंबई - १६ वर्षांपूर्वी या दिवशी अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेला संजय लीला भन्साळी यांचा 'ब्लॅक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील राणीने साकारलेली भूमिका तिच्या आयुष्यातील आजवरची सर्वात आव्हानात्मक भूमिका होती. मात्र ही भूमिका करण्यास सुरुवातीला ती नाखूष होती, असे सांगून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

"संजयने मला भूमिकेची ऑफर दिली तेव्हा सुरुवातीला मी चित्रपट करण्यास नाखूष होते. मला या चित्रपटाविषयी किंवा त्यातील भूमिकेबद्दल काही शंका होती त्यामुळे नाही, कारण भन्साळीसोबत काम करणे कोणत्याही अभिनेत्याचे स्वप्न असते," असे राणी म्हणाली.

'ब्लॅक'मध्ये अंध आणि बहिऱ्याची मुलीची आव्हानात्मक भूमिका

राणीने या चित्रपटात जन्मताच अंध आणि बहिऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. यात तिची शिक्षकासाोबत असलेल्या घट्ट नात्याची ही कथा होती. शिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती.

ही भूमिका झेपेल का याबद्दल राणीला होती शंका

"देवदास 'पाहिल्यानंतर मी संजय लीला भन्साळी यांच्या कामाची पूर्वीपासूनच एक प्रचंड फॅन होते. त्यामुळे भन्साळींबरोबर काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. असे असले तरी एक अभिनेत्री म्हणून मला सक्षम असा विश्वास नव्हता. याबद्दल मी संजयसोबत चर्चा केली आणि विचारले, मला ही भूमिका तुम्ही देताय साबद्दल तुम्ही ठाम आहात काय? मला वाटते की ही भूमिका फारच अवघड आहे, ज्याची मी कधी आयुष्यात कल्पनाही केलेली नाही.'', असे राणी म्हणाली.

सुरुवातीला राणी घाबरली होती पण तिच्यावर संपूर्णपणे भन्साळींचा विश्वास होता ज्यामुळे तिला "ब्लॅक" बनविण्यात मदत झाली.

भन्साळींच्या विश्वासामुळेच राणीने स्वाकारली भूमिका

जेव्हा त्यांनी मला विश्वास दिला की ही भूमिका मी करू शकेन आणि त्यानंतर प्रत्येक पायरीवर त्यांनी मला मार्गदर्शन केले. याचा फायदा मला मिशेल मॅक्नाली साकारताना झाला, असेही राणीने संगितले.

६ महिने अंध आणि बहिऱ्यांसोबत राहून शिकली भाषा

राणी पुढे म्हणाली, "संजयने आपले वचन पूर्ण केले कारण मी प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि भाषा शिकत होते आणि सर्व अपंग लोकांशी ६ महिने संवाद साधत होते आणि त्यानंतर मी मिशेलच्या भूमिकेत येऊ शकले," असे राणी पुढे म्हणाली.

हेही वाचा - विभक्त होणे ब्रेकअप झाल्यासारखे वाटले - श्वेता बसू प्रसाद

दिलीप कुमार यांनी केले राणीच्या भूमिकेचे कौतुक

तिची भूमिका पाहून दिलीप कुमार यांनी तिचे कौतुक केले याबद्दलही राणीने सांगितले.

"जेव्हा दिलीप कुमार यांनी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांनी माझ्या कामाबद्दल आणि माझ्यासाठी कौतुकाचे पत्र लिहिले - मला वाटते की दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गज प्रतिष्ठित अभिनेत्याकडून एक अभिनेत्री म्हणून मला मिळालेली प्रशंसा सार्वात महत्त्वाची होती. त्यांच्या सारख्या स्पेशियनकडून माझ्या पाठीवर थाप आणि आशिर्वाद मिळणे हा माझा सन्मान करण्यापेक्षा कमी नव्हते," असे ती म्हणाली.

राणीच्या वडिलांनी केले होते दिलीप कुमारसोबत काम

राणीने सांगितले की तिचे वडील दिवंगत चित्रपट निर्माते राम मुखर्जी यांनी दिलीप कुमारसोबत काम केले आहे. राणीचे दिवंगत वडील दिलीप कुमार यांच्या १९६४ मध्ये रिलीज झालेल्या ‘लीडर’ या चित्रपटाचे पटकथा लेखक होते. ती दिलीप कुमार यांच्या बद्दलच्या गोष्टी ऐकतच लहानाची मोठी झाल्याचे राणीने सांगितले.

हेही वाचा - अभिनेत्री रश्मीका मंदनाचा ‘मिशन मजनू’ आहे सिद्धार्थ मल्होत्रा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.