मुंबई - अभिनेता रणदीप हुडा लवकरच संजय लीला भन्साळींच्या आगामी मिस्ट्री थ्रिलरमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. भन्साळी प्रॉडक्शनच्यावतीने तीन चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. रणदीप काम करणार असलेला हा मिस्ट्री थ्रिलर विनोदी ढंगाचा असल्याचे सांगितले जाते. या चित्रपटात रणदीप पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचे समजते. याचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक बलविंदर सिंग जानूजा करणार आहेत.
रणदीप हुडा सध्या लव्ह आज कलच्या सीक्वल चित्रपटात काम करत असून यात कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या भूमिका आहेत. रणदीपच्या हातात एक हॉलिवूड चित्रपटदेखील आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटांची शीर्षके ठरली आहेत. 'ट्यूसडे अँड फ्रायडे' या चित्रपटात पूनम धिल्लनचा मुलगा अनमोल ठाकेरिया आणि जातलेका मल्होत्रा काम करीत असून जावेद जाफरीचा मुलगा मिझान आणि भन्साळींची भाची शर्मिन सैगल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. भन्साळींचा दुसरा चित्रपट बालाकोट एअर स्ट्राईकवर आधारित असेल.