मुंबई - प्रेक्षकांना चित्रपटांतून नवीन जोड्या बघायला आवडतात. चित्रपट निर्माते दिग्दर्शक सुद्धा वेगवेगळ्या लोकप्रिय हिरो-हिरॉइन्सना एकत्र आणण्यासाठी शक्कल लढवत असतात. जेव्हा दिग्दर्शक लव्ह रंजन यांनी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांना आपल्या चित्रपटासाठी घेतलं तेव्हाच त्या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती. नुकतेच लव्ह फिल्म्सने घोषित केले की त्यांचा आगामी चित्रपट, रणबीर व श्रद्धा अभिनित, पुढील वर्षी होळीला प्रदर्शित होणार आहे. २०२२ च्या १८ मार्चला, अद्याप अशीर्षकांकित, हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण जोरात सुरु आहे.
रणबीर कपूर, श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एकत्र येणार अद्याप शीर्षक नसलेल्या या रॉम-कॉमचे शूटिंग या जानेवारीत दिल्लीत सुरू झाले. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदा एकत्र जोडले गेले आहेत. अद्याप अशीर्षकांकित चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ही नवीन रोमँटिक जोडी पाहून चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील महत्वपूर्ण भूमिका करीत आहेत.
रणबीर कपूर, श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एकत्र येणार प्यार का पंचनामा मालिका आणि सोनू के टीटू की स्वीटी सारख्या यशस्वी चित्रपटांसाठी प्रसिद्ध लव्ह रंजन प्रसिद्ध असून तोही पहिल्यांदाच, पहिल्यांदा एकत्र येणाऱ्या रणबीर आणि श्रद्धा सोबत, एकत्र आला आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली असून गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांची प्रस्तुती आहे.रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत लव्ह रंजन दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट पुढील वर्षी होळीला, १८ मार्च २०२२ ला, रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - सरसेनापती हंबीररावमध्ये 'हा' अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराज!