ETV Bharat / sitara

कंडोम परिक्षकाची भूमिका साकारणार रकुल प्रीत सिंह - अभिनेत्री रकुल प्रीत सिंह

निर्माता रॉनी स्क्रूवाला यांच्या आगामी बोल्ड विषयावरील चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात ती कंडोम परिक्षकाची भूमिका साकारणार आहे.

Rakul Preet Singh
रकुल प्रीत सिंह
author img

By

Published : Apr 27, 2021, 8:47 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह एका सोशल कॉमेडी चित्रपटात निर्माता रॉनी स्क्रूवालाच्या आगामी प्रॉडक्शन व्हेंचरमध्ये सहभागी झाली आहे.

रकुल प्रीत हिच्याकडे असलेल्या चित्रपटांची यादी पाहिली तर ती वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. आगामी कॉमेडी चित्रपटात रकुल कंडोम परिक्षकाची भूमिका साकारणार आहे. कंडोमचा वापर व्हावा असा चित्रपटाचा उद्देश आहे. योग्य संदेश देण्यासाठी निर्मात्यांनी या बोल्ड विषयात आवश्यक तेवढा विनोद वापरुन समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय.

रॉनीचा हा चित्रपट बाजूला ठेवला तर रकुलकडे आणखी एक वेगळा चित्रपट आहे. आयुष्मान खुराणासोबत ती डॉक्टर जी हा चित्रपट करीत आहे. नवोदित दिग्दर्शिका अनुभूती कश्यपचा हा पदार्पणाचा चित्रपट आहे.

दरम्यान, 'सरदार का ग्रँडसन' चित्रपटाच्या रिलीजसाठी रकुल तयार आहे, यात अर्जुन कपूर, अदिती राव हैदरी, जॉन अब्राहम आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे १८ मे रोजी डिजिटल रिलीज होणार आहे.

हेही वाचा - मराठी अभिनेते पुंडलिक पालवे यांचा कोरोनाने घेतला बळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.