ETV Bharat / sitara

वरुणच्या 'कुली नंबर १'मध्ये राजपाल यादवची वर्णी, डेविड धवनचे मानले आभार - Coolie No 1

चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खानची वर्णी लागली आहे. तर आता चित्रपटातील आणखी एका पात्राविषयीची माहिती समोर आली आहे. या सिनेमात कॉमेडी अभिनेता राजपाल यादवही झळकणार आहे. यावर आता राजपाल यादवने प्रतिक्रिया दिली आहे.

वरूणच्या 'कुली नंबर १'मध्ये राजपाल यादवची वर्णी
author img

By

Published : Jul 22, 2019, 9:46 PM IST

मुंबई - गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कुली नंबर १' चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला. डेविड धवन यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. ज्यानंतर आता डेविड धवन याच चित्रपटाचा सिक्वेल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खानची वर्णी लागली आहे. तर आता चित्रपटातील आणखी एका पात्राविषयीची माहिती समोर आली आहे. या सिनेमात कॉमेडी अभिनेता राजपाल यादवही झळकणार आहे. यावर आता राजपाल यादवने प्रतिक्रिया दिली आहे.

या चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी वरुण धवन आणि डेविड धवन यांचे आभार मानतो. वरुणसोबत स्क्रीन शेअर करण्याची ही माझी तिसरी वेळ आहे. या रिमेकसाठी मी खूप उत्सुक आहे, असं राजपाल यादव म्हणाला. दरम्यान राजपालने याआधी 'मैं तेरा हीरो' आणि 'जुड़वा 2' सारख्या सिनेमांत वरूणसोबत काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शनही डेविड धवन यांनीच केले होते.

राजगोपाल वर्मा यांच्या 'जंगल' चित्रपटानं मला कलाकार बनवलं, प्रियदर्शन यांच्या हंगामा चित्रपटाने मला प्रसिद्धी मिळवून दिली. तर डेविड धवन यांच्या जुडवा २ चित्रपटानं मला कमबॅकची संधी दिली, असं राजपाल म्हणाला. दरम्यान, 'कुली नंबर १' चा रिमेक पुढील वर्षी म्हणजेच १ मे २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.