ETV Bharat / sitara

राजपाल यादवने बदलले स्वतःचे नाव...यापुढे 'या' नावाने ओळखला जाणार!! - राजपाल यादवने बदलले स्वतःचे नाव

अभिनेता राजपाल यादवलने आपले नाव बदलले आहे. यापुढे तो आपले नाव नव्याने सांगणार आहे. 'फादर ऑन सेल' या आगामी चित्रपटापासून आपले संपूर्ण नाव जगातील प्रेक्षकापर्यंत पोहोचेल, असे त्याने म्हटलंय.

Rajpal Yadav
राजपाल यादव
author img

By

Published : Jul 5, 2021, 11:01 PM IST

मुंबई - राजपाल यादव हा बॉलिवूडमधील अत्यंत हरहुन्नरी अभिनेता आहे. त्याने आज आपल्या चमकदार अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत नेहमीच रंजक आणि आव्हानात्मक भूमिका केल्या आहेत. आपल्या जबरदस्त अभिनय आणि कॉमेडीमुळे तो बर्‍याच वर्षांपासून प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत आहे. अशा या राजपालने एक मोठा खुलासा केला आहे. राजपाल यादव म्हणतो की, त्याने आपले नाव बदलले आहे.

राजपाल यादव याने एका मुलाखती दरम्यान सांगितले की आपले नाव बदलणार आहे. त्याने आपल्या नावात वडिलांचे नाव जोडले आहे. यापुढे तो आपले नाव राजपाल नौरंग यादव या नावाने ओळखला जाईल. याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'माझ्या वडिलांचे नाव माझ्या पासपोर्टमध्ये नेहमीच राहिले आहे, फक्त एकच गोष्ट आहे की आता ते पडद्यावरदेखील दिसेल.

अपूर्व व्यासने मला वेब सीरिज आणि नवीन चित्रपटाची ऑफर दिली तेव्हा मला वाटले की कोविडपूर्वी मी फक्त राजपाल यादव होतो. आता जेव्हा सगळे जग एका गावात बदलले गेले आहे, तेव्हा मला माझे संपूर्ण नाव वापरले पाहिजे. 'फादर ऑन सेल' या चित्रपटापासून माझे संपूर्ण नाव जगातील प्रेक्षकापर्यंत पोहोचेल.

राजपाल यादव यांच्या कामाविषयी बोलायचे तर तो लवकरच 'हंगामा 2' चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात परेश रावल, शिल्पा शेट्टी, मीझान जाफरी आणि प्रणिता सुभाष देखील असतील. त्यानंतर राजपाल लवकरच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत 'भूल भुलैया 2' मध्ये काम करताना दिसणार आहे.

हेही वाचा - अनुभव सिन्हांनी केली हंसल मेहतांशी हातमिळवणी, 'अॅक्शन थ्रिलर'ची करणार निर्मिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.