ETV Bharat / sitara

राजकुमार रावची धमाल 'छलांग', बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज - Nusrat Bharucha latest news

नवे पोस्टर झळकले आहे. या चित्रपटात त्याची नुसरत भरुचासोबत जोडी असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शालेय शिक्षणामध्ये असलेल्या खेळाच्या महत्त्वाचा संदेश या चित्रपटातून हसत खेळत देण्यात आलाय.

Rajkumar Rao's Dhamal 'Chhalaang
राजकुमार रावची धमाल 'छलांग'
author img

By

Published : Oct 17, 2020, 6:12 PM IST

मुंबई - बहुप्रतीक्षित 'छलांग' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री कमाल असल्याचे दिसत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या ट्रेलरची लिंक ट्विट केली आहे.

अजय देवगण यांची निर्मिती असलेल्या 'छलांग' चित्रपटाची कथा मिश्किल आणि नर्म विनोदी आहे. राजकुमार राव यात पीटी शिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ तो शिकवत असतो. अजूनही त्याच्या आयुष्यात आवडणारी मुलगी आलेली नाही. अशात अभिनेत्री नुसरत भरुचा कॉम्प्युटर शिक्षिका म्हणून दाखल होते आणि सगळा माहोल बदलून जातो.

या चित्रपटात अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. शालेय शिक्षणामध्ये असलेल्या खेळाच्या महत्त्वाचा संदेश या चित्रपटातून हसत खेळत देण्यात आलाय.

'छलांग' चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले असून असून टी सिरीजच्या वतीने रिलीज होत आहे. १३ नोव्हेंबर २०२० ला हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.