ETV Bharat / sitara

राजकुमार हिरानींचा ‘संजू’ झाला तीन वर्षांचा...!

author img

By

Published : Jul 2, 2021, 9:01 PM IST

राजकुमार हिरानी यांचा पहिलाच ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर संजय दत्त आणि हिरानी यांची घट्ट मैत्री झाली. यातच संजूबाबाच्या आयुष्यातील फिल्मी चढ उतार हिरानी यांनी टिपले आणि त्यावर संजू या चरित्रपटाची निर्मिती केली. याच संजू चित्रपटाला आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

Sanju has completed three years
‘संजू’ झाला तीन वर्षांचा...!

राजकुमार हिरानी यांची दिग्दर्शनाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा पहिला चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ने अनेक प्रथितयश दिग्दर्शकांना अवाक केले. त्यांची प्रसंगांची मांडणी अप्रतिम होती. या चित्रपटात शाहरुख खान ‘मुन्नाभाई’ च्या अवतारात दिसणार होता परंतु ती भूमिका संजय दत्तने साकारली. ती व्यक्तिरेखा संजयच्या पर्सनॅलिटीमध्ये इतकी फिट बसली की प्रेक्षक आता दुसऱ्या कुणालाही मुन्नाभाई म्हणून बघूच शकणार नाही. यात मोठा हात आहे राजकुमार हिरानी यांचा. त्यांच्या अफलातून प्रेझेंटेशनमुळे संजय दत्त आणि मुन्नाभाई अविभाज्य झाले. या चित्रपटापासून संजय दत्त आणि राजकुमार हिरानी यांच्यात घट्ट मैत्री झाली इतकी की हिराणींना संजय दत्तच्या आयुष्याबद्दल संपूर्णतः कळले.

Sanju has completed three years
‘संजू’ झाला तीन वर्षांचा...!

त्यानंतर त्या दोघांनी मिळून ‘लगे रहो मुन्नाभाई’ बनविला आणि तोही तूफान चालला. हिराणींना संजय दत्त च्या आयुष्यातील नाट्य चित्रपटासाठी खुणावू लागले आणि त्यांनी संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा चित्रपट बनविला. जेव्हा हा चित्रपट बनवायचे ठरले तेव्हा संजय आणि राजू यांच्या संभाषणामधील बनविलेल्या नोंदी हजारेक पानांच्या झाल्या होत्या. त्यातून काही निवडक नाट्यप्रसंग घेऊन ‘संजू’ ची पटकथा बनविण्यात आली. रणबीर कपूर ला जेव्हा संजय दत्त च्या भूमिकेसाठी निवडले होते तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. परंतु जेव्हा ‘संजू’ चा ‘फर्स्ट लूक’ बाहेर आला तेव्हा सर्वचजण, फिल्म इंडस्ट्रीतलेसुद्धा, अवाक झाले होते. रणबीर ने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि राजकुमार हिरानी यांचे ‘व्हिजन’ इतके जबरदस्त निघाले की रणबीर थेट संजूच दिसत होता.

Sanju has completed three years
‘संजू’ झाला तीन वर्षांचा...!

जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज व्हायचा होता तेव्हा राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांनी आधी तो रणबीर चे वडील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना दाखविला होता. आश्चर्य म्हणजे ऋषी कपूर ने आपल्या मुलाला ओळखलेच नाही इतका तो पडद्यावर संजय दत्त सारखा दिसत होता. ते खूप भावुकही झाले होते आणि बाजूला बसलेल्या पत्नीला, नीतू कपूर ला, सांगितले की त्याला हे सांगू नकोस की मी त्याची स्तुती करीत होतो. अजून त्याला बराच लांबचा पल्ला गाठायचाय. रणबीर कपूरला आपल्या वडिलांबद्दल नेहमीच आदरयुक्त भीती होती. परंतु यावरून कळले असेलच की रणबीर कपूर ने ’संजू’ साठी केलेले परिवर्तन किती पर्फेक्ट होते.

Sanju has completed three years
‘संजू’ झाला तीन वर्षांचा...!

२९ जून २०२१ ला ‘संजू’ च्या प्रदर्शनाला तीन वर्षे झाली आणि रणबीर व दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह 'बिहाइंड-द-सीन' फोटोसह चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना सोनम कपूरने लिहिले, “या चित्रपटाचा भाग होण्याचा अनुभव अविश्वसनीय होता. खरोखर, संजू, एक माणूस जो एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगला.” ‘संजूच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आणि ते आम्ही चिन्हांकित करण्याचा प्रयत्न केला. काही क्षण तर अविश्वसनीय आहेत परंतु पूर्णतः खरे आहेत. त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक कथा उभी होती. एक अविश्वसनीय कथा पण विलोभनीय आणि खरी ...’, संजय दत्तबद्दल आपले मत व्यक्त करताना राजकुमार हिरानी म्हणाले.

संजय दत्त ला मोठ्या पडद्यावर पाहणे हे त्याची आई नर्गिस दत्त हिचे स्वप्न होते व ते पुरे करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला घेऊन ‘रॉकी’ चित्रपट बनविला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तीन दिवस आधी कॅन्सरग्रस्त नर्गिस दत्त ने प्राण सोडले आणि त्या आघातातून संजू बरीच वर्षे बाहेर पडू शकला नव्हता. परंतु या बायोपिकमध्ये संजय दत्त ची समाजात मलीन झालेली प्रतिमा (त्याच्या घरात सापडलेल्या रायफल्स इत्यादी) पुसण्याचा प्रयत्न केला गेला आहे अशी टीका झाली होती.

प्रदर्शनाची तीन वर्षे पूर्ण झालेल्या ‘संजू’ या बायोपिकमध्ये रणबीर कपूर सोबत सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, विक्की कौशल, परेश रावल आणि मनीषा कोईराला यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
हेही वाचा - धकधक गर्ल OTT वर: माधुरी दीक्षित झळकणार 'मेरे पास माँ है'मध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.