मुंबई - पॉर्न रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १४६७ पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केल्याच्या एक दिवसानंतर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याने मुंबई सत्र न्यायालयातून त्याचा जामीन अर्ज मागे घेतला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानं आता त्याच आधारावर कुंद्रा जामीनासाठी दावा दाखल करणार आहे.
जामीन अर्ज मागे घेतला -
फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवोदित कलाकारांना अर्धनग्न, नग्न चित्रे आणि व्हिडीओ काढण्याचे आमिष दाखवले गेले होते, जे नंतर अपलोड केले गेले. कुंद्रा अंधेरी येथील विआन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातून हॉटशॉट्स अॅप चालवत असे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास इच्छुक तरुणींना ब्रेक देण्याचे बहाण्याने अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या राज कुंद्रा व रायन थॉर्प यांची नावे गुन्हे शाखेने चार्जशीटमध्ये नोंदवली आहेत. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांना मुंबई गुन्हे शाखेने १ जुलै रोजी अटक केली होती आणि ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची जामीन याचिका मुंबई सत्र न्यायालयापुढे प्रलंबित होती. आज त्यावर सुनावणी होणार होती, मात्र कालचा मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पुरवणी चार्जशीट दाखल केले आहे. त्यात राज कुंद्रा याचे नाव असल्याने त्याने आता याच न्यायालयात जामीन मिळावा यासाठी मुंबई सत्र न्यायालयातून आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे.
ब्रेक देण्याचे बहाण्याने अश्लिल चित्रफिती -
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास इच्छुक तरुणींना ब्रेक देण्याचे बहाण्याने अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या पॉर्न फिल्म प्रॉडक्शन कंपनीबाबत माहिती प्राप्त झाल्याने दिनांक ०४/०२/२०२१ रोजी मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा यांनी पर्दापाश करून मालवणी पोलीस ठाणे गु.र.क्र. १०३ / २०२१ गुन्हा नोंद करून ५ आरोपींना अटक केले होते. सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान एकूण ०९ आरोपींना अटक करून त्यांचेविरुध्द दिनांक ०१/०४/२०२१ रोजी न्यायालयात एकूण ३५२९ पानांचे दोषारोपपत्र दाखल करून तपास सुरु होता.
पॉर्न फिल्मबाबत बरेच पुरावे -
पॉर्न केसमधील मुख्य सूत्रधार याचा मालमत्ता कक्षामार्फत तपास सुरु असताना तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब व जप्त कागदपत्रांवरुन हॉटशॉटस् अॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले. न्यायालयाकडून सर्च वॉरन्ट प्राप्त करून राज कुंद्रा यांच्या अंधेरी येथील कार्यालयाची झडती घेतली असता त्यामध्ये पोर्न फिल्मबाबत बरेच पुरावे प्राप्त झाले. त्याआधारे रिपु सुदन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा व त्याचे विआन इंडस्ट्रीज कंपनीतील आय. टी. हेड रायन जॉन थॉर्प यांना या गुन्हयात दिनांक १९/०७/२०२१ रोजी अटक करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - शाहरुख खानच्या आगामी सिनेमाचे नाव असेल 'lion', डॉक्यूमेंट झाले लीक