मुंबई - टीव्ही अभिनेता पुरब कोहली आणि त्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. पुरबनेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती. तो सध्या कुटुंबासोबत लंडन येते स्थायिक आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली होती. यामधून आता ते ठणठणीत बरे झाले आहेत.
पुरबने पुन्हा एक पोस्ट शेअर करून त्यांची कोरोनाची चाचणी आता निगेटिव्ह आल्याचे सांगितले आहे. त्याने आपल्या पोस्ट मधून शुभचिंतक तसेच चाहत्यांचे आभार मानले आहेत. तुमचे प्रेम आणि आशिर्वाद आमच्या सोबत होते म्हणून आम्ही या कठीण प्रसंगाचा धीराने सामना करू शकलो, असे त्याने यामध्ये लिहिलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कोरोनाशी लढण्यासाठी जे काम करत आहेत, त्या सर्वांना सलाम आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा, असे आवाहनही त्याने केले आहे.