मुंबई - प्रसिद्ध रॅपर हनी सिंग याला पंजाबच्या महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. हनी सिंगने आपल्या मखना या गाण्यात स्त्रियांबद्दल अशोभनीय भाषा वापरली असल्याचे यात म्हटले गेले आहे. लवकरच याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी म्हटले आहे.
-
Manisha Gulati, Chairperson Punjab State Women Commission on notice sent to singer Honey Singh over his song ‘Makhna’: Vulgar language has been used in song for women. We have taken suo-moto action. FIR will be registered soon. I hope state govt will also take action against him pic.twitter.com/vrEIbVlET8
— ANI (@ANI) July 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Manisha Gulati, Chairperson Punjab State Women Commission on notice sent to singer Honey Singh over his song ‘Makhna’: Vulgar language has been used in song for women. We have taken suo-moto action. FIR will be registered soon. I hope state govt will also take action against him pic.twitter.com/vrEIbVlET8
— ANI (@ANI) July 3, 2019Manisha Gulati, Chairperson Punjab State Women Commission on notice sent to singer Honey Singh over his song ‘Makhna’: Vulgar language has been used in song for women. We have taken suo-moto action. FIR will be registered soon. I hope state govt will also take action against him pic.twitter.com/vrEIbVlET8
— ANI (@ANI) July 3, 2019
यासोबतच राज्य सरकारही याविरोधात लवकरच कारवाई करेल, अशी अपेक्षा गुलाटी यांनी व्यक्त केली आहे. यासंबंधात १२ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याची विनंती आम्ही पोलिसांनी केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महिलांविरोधी आक्षेपार्ह शब्द असलेलं हे गाणं पंजाब राज्यात बॅन केलं जावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान हनी सिंगच्या मखना गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. केवळ महिनाभरातच हे गाणं 100 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले होते. या गाण्यात त्याच्यासोबत नेहा कक्करसुद्धा पाहायला मिळाली होती. आता महिला आयोगाच्या या नोटीसवर हनी सिंग काय प्रतिक्रिया देणारं तसंच हे गाणं बॅन केलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.