ETV Bharat / sitara

परिणिती म्हणते, ''प्रियंका भाग्यवान म्हणून निकसारखा नवरा मिळाला''

author img

By

Published : Sep 29, 2020, 12:44 PM IST

परिणिती चोप्राला वाटते की, तिची चुलत बहीण प्रियंका चोप्रा भाग्यवान ठरली आहे. कारण तिचा नवरा निक जोनास एक प्रामाणिक आणि साधा माणूस आहे. परिणिताने सांगितले की निकमध्ये सर्व चांगले गुण आहेत.

Parineeti Chopra
प्रियंका चोप्रा भाग्यवान ठरली

मुंबई - अभिनेत्री परिणिती चोप्रा हिला तिचा मेहुणा अमेरिकन गायक निक जोनास याच्याबद्दल खूप कौतुक आहे. तिची बहिण प्रियंका चोप्रा हिने नितसोबत २०१७मध्ये विवाह केला होता. परिणितीला असे वाटते की, निक जीवनसाथी म्हणून मिळल्यामुळे तिची चुलत बहीण भाग्यवान आहे.

परिणीती अविवाहित आहे. ब्रेकअप्सना सामोरे जाण्यासाठी तिची मानसिक तयारी झाली होती. याबद्दल बोलण्यापासून ती कधीही मागेपुढे पाहत नाही आणि यामुळे आज तिला याचे हसू येते.

परिणीतीने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रेमाबद्दल, आयुष्य आणि करिअरसह अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

तिच्या मिमीने (प्रियांका) निक बरोबर लग्न केले, त्याला आता दोन वर्षं झाली आहेत. तिच्या आयुष्यात असे प्रकार घडत आहे की नाही, असे विचारले असता ती म्हणाली, की आमची देसी गर्ल "लुक आऊट" आहे.

"मी नक्कीच म्हणू शकते की, तिने शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट पुरुषाबरोबर प्रेम केले आहे. निकस्टर (निक जोनास) परिपूर्ण मुलासारखा आहे. त्याने तिला खूप चांगले समजून घेतले आहे, तो यशस्वी आहे, तो खूप कौटुंबिक आहे, तो प्रामाणिक आणि साधा आहे आणि त्याला खरोखर काळजी आहे,'' असे परिणीती म्हणाली.

प्रियंकाच्या आनंदमागचे कारण निक असून तिच्या म्हणण्यानुसार तो सर्वोत्कृष्ट व्यक्ती असल्याचेही तिने म्हटले आहे.

"लग्नाच्या जवळपास सहा-आठ महिन्यांपूर्वीच माझी निकची ओळख झाली. मिमी दीदी (प्रियांका) अक्षरशः खूप आनंदी आहे. मला भेटलेला हा सर्वात चांगला माणूस आहे. जो मला समजून घेऊ शकेल, अशा व्यक्तीवरच मी प्रेम करेन.'', असेही परिणिती म्हणाली.

परिणिती आगामी ''संदीप और पिंकी फरार'' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले असून तिच्याबरोबर 'इशकजादे'चा सह-कलाकार अर्जुन कपूर देखील आहे.

तिचा आणखी एक आगामी चित्रपट 'दि गर्ल ऑन द ट्रेन' या मनोवैज्ञानिक थ्रीलरचा हिंदी रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता करीत आहेत. हा चित्रपट 'गर्ल ऑन द ट्रेन' या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे, जो याच नावाच्या पॉला हॉकिन्सच्या २०१५ च्या बेस्टसेलर पुस्तकावर आधारित आहे. बॉलिवूड व्हर्जनमध्ये कीर्ती कुल्हारी, अदिती राव हैदरी आणि अविनाश तिवारी महत्वाच्या भूमिकेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.