मुंबई - प्रियांका चोप्राला प्रसिद्धीत कसे राहायचे हे चांगलेच अवगत आहे. ती नेहमीच आपल्या फॅशनने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. बॉलिवूड आणि हॉलिवूड गाजविणारी ही ‘मिस वर्ल्ड’ विजेती नवनवीन फॅशन्स करायला घाबरत नाही. प्रत्येक रेड कार्पेटवर बोल्ड आणि सेनश्युअस लूक्समध्ये अवतरते. काही दिवसांपूर्वीच तिने ‘ऑस्कर’चा नॉमिनेशन सोहळा, तिचा नवरा निक जोनाससह, आपल्या लंडनच्या घरून सूत्रसंचालित केला. त्यावेळी तिने हॉलिवूडच्या पारंपरिक गाऊन ला फाटा देत आकर्षक निळा ‘मिडी’ परिधान केला होता.
दोनेक दिवसांपूर्वी प्रियंकाने ‘बाफ्टा‘ (ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्टस्) च्या अवॉर्डचे सूत्रसंचालन केले. हे करताना तिने गाऊन न घालता दोन वेगवेगळे ड्रेसेस परिधान केले होते. व त्याची चर्चाही खूप झाली. तिने हा सोहळा धोती शैलीतील पँटमध्ये सादर केला. तिने प्रामुख्याने आपले भारतीयत्व दर्शवित संपूर्ण जगाचे लक्ष वळविले. खासकरून विदेशी फॅशन करणाऱ्यांचे. तिचे धोती-शैलीतील पॅन्ट आणि लाल रंगातील एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट लक्षवेधक होते. त्याला पूरक ज्वेलरी तिने घातली होती. परंतु या ड्रेसमधून डोकावणारे अंग तिला ट्रोल होण्यासाठी पुरेसे होते.
‘बाफ्टा’ अवॉर्ड्सची प्रमुख प्रस्तुतकर्ती म्हणून प्रियांका चोप्राने आपली फॅशन जगाला दाखविली. त्याच दिवशी त्याच कार्यक्रमात तिने दुसरा ड्रेसही परिधान केला होता. पण तिच्या लूकचे मुख्य आकर्षण म्हणजे तिच्या जाकीटवर बहू-छटी प्रिंटेड फुलपाखरू हे होतं. यातही तो बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत होती आणि यातूनही होणारे अंगप्रदर्शन ‘संस्कारी नेटिझन्स’ ना खटकले. परंतु लोकांचं ऐकून चालेल ती प्रियांका चोप्रा कुठली?
परंतु एक मात्र खरं की प्रियांका चोप्राने, बॉलिवूड प्रमाणेच आंतरराष्ट्रीय मनोरंजनसृष्टीवरही आपली छाप सोडली आहे.