मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी स्वतःला अस्थमा असल्याचा खुलासा केला होता. अशात आता तिचा कुटुंबीयांसोबत सिगरेट पितानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामुळे यूर्जसने तिच्यावर निशाणा साधला आहे.
या फोटोत प्रियांका आई मधु चोप्रा आणि पती निक जोनाससोबत सिगरेट पिताना दिसत आहे. खरंतर गेल्या वर्षी प्रियांकाने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती सांगत होती, की मलाही अस्थमा आहे. यावर्षी दिवाळीत फटाके फोडू नका, दिवाळी हा सण दिवे, लाडू आणि प्रेमाचा आहे, प्रदूषणाचा नाही, असं तिनं या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं.
-
@all_iz_wel smoking is awful!! Yuck!!
— PRIYANKA (@priyankachopra) February 6, 2010 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">@all_iz_wel smoking is awful!! Yuck!!
— PRIYANKA (@priyankachopra) February 6, 2010@all_iz_wel smoking is awful!! Yuck!!
— PRIYANKA (@priyankachopra) February 6, 2010
याचाच संदर्भ देत अनेकांनी आता तिला सवाल केला आहे, की अस्थमा फक्त दिवाळीतच होतो का? तर एका यूजरने म्हटलं आहे, प्रियांका दिवाळी अजून लांब आहे. लोकांनी आतापासूनच प्रदूषण करायला सुरूवातही केली. तर एकानं म्हटलं, वेगळीच अस्थमा रूग्ण आहे. तिला फक्त फटाक्यांनीच त्रास होतो, सिगरेटच्या धुरानं नाही.
गेल्या वर्षी प्रियांकाने या गोष्टीचा खुलासा केला होता की, वयाच्या पाचव्या वर्षीच मला अस्थमा असल्याचे निदान झाले. मात्र, हा आजार मला माझी स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवू शकला नसल्याचेही तिने म्हटले होते.