मुंबई - बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा हिचे वडिल अशोक चोप्रा यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त प्रियांकाने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांची कमतरता प्रियांकाला आजही जाणवते. तिने शेअर केलेल्या पोस्टमधुन तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
२०१३ साली अशोक चोप्रा यांचं निधन झालं होतं. नेहमी ती तिच्या वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर करत असते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त प्रियांकाने त्यांचा एक फोटो असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अशोक चोप्रा यांचे आवडतं गाणं 'कहां से लाई हो जाने मन ये किताबी चेहरा-गुलाबी आंखें', हे देखील ऐकायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हा व्हिडिओ शेअर करुन प्रियांकाने लिहिलंय, की 'मी आणि सिद्धार्थ (प्रियांकाचा भाऊ) दरवेळी तुमच्या जन्मदिनी काहीतरी सरप्राईझ देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, ते आम्ही करू शकत नाही. कारण, ते तुम्हाला अगोदरच माहित असतं. तुम्ही जिथे कुठे असाल, तरीही नेहमी आमच्या सोबत आहात. प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्यासोबतच आहात', असे तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
प्रियांकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर या पोस्टवर अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडीस, ईशा गुप्ता, डॅनियल जोनास यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.