ETV Bharat / sitara

प्रियंका चोप्राने शेअर केला २०१९ च्या काही संस्मरणीय आठवणींचा व्हिडिओ - Priyanka Chopra video loaded with fond memories

प्रियंका चोप्राने नवीन वर्षाच्या निमित्तने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने २०१९ च्या अनेक संस्मरणीय घटनांचा उल्लेख केलाय. यात तिच्या खासगी आयुष्यातील काही घटनांचाही समावेश केलाय.

Priyanka chopra
प्रियंका चोप्रा
author img

By

Published : Jan 1, 2020, 6:58 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने नवीन वर्षाच्या निमित्ताने चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने २०१९ या वर्षात तिच्या आयुष्यातील काही संस्मरणीय घटनांना स्थान दिलंय.

मॅडम तुसाद म्यूझियममधील तिच्या पुतळ्यापासून ते 'द स्काई इज पिंक' या चित्रपटातील घटनांचा या व्हिडिओत समावेश आहे. यात तिने खासगी आयुष्यातील काही घटनांचाही समावेश केलाय. यात तिचा पती निक जोनासही दिसून येतो.

प्रियंकाने व्हडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ''एका वर्षाची आणखी एक भेट. २०२० च्या पेटाऱ्यामध्ये काय दडलंय याची प्रतीक्षा करु शकत नाही. ईश्वर आणि इतर सर्वांचे आभार, ज्यांनी माझ्या आयुष्यात आनंद आणला.''

प्रियंकाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडलाय. तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत चाहत्यांनी तिला कॉमेंट्सही केल्या आहेत.

प्रियंका अलिकडे 'द स्काई इज पिंक' या चित्रपटात अलिकडे झळकली होती. यात तिच्यासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम, आणि रोहित शराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

'द स्काई इज पिंक' या चित्रपटात प्रियंका ३ वर्षानंतर झळकली होती. यासोबतच तिने 'फ्रोजन 2' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे हिंदी डबिंग केले होते.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.