ETV Bharat / sitara

प्रतिष्ठा मानवी जीवनात सर्वात किंमती खजिना - मुंबई सत्र न्यायालयाचा केआरकेला इशारा - मुंबई सत्र न्यायालयाचा केआरकेला इशारा

सलमान खानच्या विरोधात अप्रत्यक्षपणे व्हिडिओ बनवणे किंवा अपलोड करणे, पोस्ट करणे, ट्वीट करणे किंवा वक्तव्य प्रकाशित करणे याविषयी अभिनेता कमाल आर खान यांना प्रतिबंधित करणारा अंतरिम आदेश मुंबई शहर दिवाणी कोर्टाने बुधवारी मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी कमाल खानच्या विरोधात दाखल सलमान खानचा मानहानीच्या दाव्या संदर्भात आदेश पारित केला आहे.

Result of KRK case against Salman
सलमान विरुध्द केआरके केसचा निकाल
author img

By

Published : Jun 23, 2021, 10:52 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खान, त्याचे व्यवसाय आणि त्यांच्या चित्रपट प्रकल्पांसह थेट किंवा अप्रत्यक्षपणे व्हिडिओ बनवणे किंवा अपलोड करणे, पोस्ट करणे, ट्वीट करणे किंवा वक्तव्य प्रकाशित करणे याविषयी अभिनेता कमाल आर खान यांना प्रतिबंधित करणारा अंतरिम आदेश मुंबई शहर दिवाणी कोर्टाने बुधवारी मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी कमाल खानच्या विरोधात दाखलसलमान खनचा मानहानीच्या दाव्या संदर्भात आदेश पारित केला आहे.

न्यायाधीश काय म्हणाले -

अंतरिम आदेश पारित करताना सत्र न्यायाधीशांनी असे म्हटले आहे की "श्रीमंतीपेक्षा चांगले नाव असणे चांगले असते. प्रतिष्ठा हा खूप संवेदनशील मुद्दा आहे, मत व्यक्त करण्याचा हक्क प्रत्यकाला आहे परंतु हा वैयक्तिक हक्क आहे आणि कोणाच्या प्रतिष्ठेवर वक्तव्य करणे ही वैयक्तिक इजा आहे. चांगली प्रतिष्ठा ही वैयक्तिक सुरक्षेचा घटक आहे आणि घटनेद्वारे जीवनाचा आनंद घेण्याच्या समान हक्काने संरक्षित केली जाते."

न्यायाधीश पुढे म्हणाले की प्रतिष्ठा म्हणजे केवळ जीवनात मीठसारखी नव्हे तर मानवी जीवनात सर्वात किमती खजिना आहे.

न्यायाधीशांनी असे मत मांडले, की प्रत्येकजण आपल्या चांगल्या नावाचा आणि स्वत:चा सन्मान मिळण्यास पात्र आहे. "शारीरिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यापेक्षा चांगल्या माणसांसाठी प्रतिष्ठा आणि सन्मान तितकाच अनमोल आहे. काही प्रकरणांमध्ये सन्मान आयुष्यापेक्षा अधिक प्रिय असू शकतो असे आढळले," असे सत्र न्यायाधीश म्हणाले.

काय आहे प्रकरण?

फिर्यादी के.आर.के यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर 'भ्रष्टाचार बॉलीवूड' या नावाने पोस्ट केलेला एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये त्याने सलमान खानसह बॉलिवूड सेलिब्रिटींवर निंदनीय, अत्यंत बदनामीकारक आरोप केले आहेत. व्हिडिओमध्ये सलमान खानची प्रतिमा भ्रष्ट असल्याचा आरोप करण्यात आले होते, असे तक्रारदारांनी म्हटले होते. नोव्हेंबर 2020 रोजी पोस्ट केलेल्या एका दुसर्‍या व्हिडिओमध्ये केआरकेने सलमान खानच्या ब्रँड 'बीइंग ह्यूमन'विरूद्ध ठामपणे दावा केला होता की ही धर्मादाय संस्था फसवणूक आणि मनी लॉड्रिंगमध्ये गुंतलेली आहे. सलमान खानने असा दावा केला आहे, की अशा प्रकारचे खोटे आरोप त्याच्या कित्येक वर्षांच्या मेहनत आणि प्रयत्नातून तयार केलेल्या त्याच्या ब्रँडची सद्भावना, प्रतिष्ठा आणि प्रतिमा डागाळत आहेत.

हेही वाचा - 'तारक मेहता'ची 'दयाबेन' आमिर खान, ऐश्वर्यासोबतही झळकली आहे मोठ्या पडद्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.