मुंबई - बॉलिवूडचे प्रोडक्शन पॉवरहाऊस यशराज फिल्म्स आपल्या बॅनरला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संग्रहालय तयार करणार आहे.
दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची 88 वी जयंती निमित्ताने 27 सप्टेंबर रोजी यशराज फिल्म्सचा 50 वा वर्धापन दिन (वायआरएफ) साजरा करणार आहे. वायआरएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांच्याहस्ते या संग्रहालयाचे अनावरण होईल.
एका व्यावसायिक सूत्राने सांगितले की, "आदित्य सध्या वायआरएफ प्रकल्प ५० च्या ब्लू प्रिंटवर काम करत आहेत आणि वायआरएफ संग्रहालयाचे अनावरण करण्याची निश्चितच मोठी योजना आहे. यामुळे सर्वसामान्यांना वायआरएफचा वारसा जाणून घेण्याची संधी मिळेल."
संग्रहालयाचे काम सुरू होण्यास लागणाऱ्या काळाविषयी बोलताना स्त्रोत म्हणाले, "वायआरएफचा समृद्ध इतिहास पाहता आयकॉनिक स्टुडिओने भारतीय प्रेक्षकांना संस्मरणीय चित्रपट दिले आहेत आणि त्यांच्या चित्रपटाने ज्या प्रकारे भारताच्या पॉप-कल्चरला आकार दिला आहे. यातून लक्षात येते की, वायआरएफ संग्रहालय खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटाच्या इतिहासात किती खास असेल याची आपण कल्पना करु शकतो.
सूत्रांनी सांगितले की, "लवकरच ही घोषणा होणार आहे, कारण आदित्य हे वायआरएफ संग्रहालय बांधण्याचे स्वप्न पाहत आहेत, असे असले तरी संग्रहालय तयार होण्यासाठी थोडा वेळ लागू शकेल."