मुंबई - अभिनेता प्रतीक बब्बर एक दशकापेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत आहे. चित्रपट व्यवसायातील प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला असल्याचे तो म्हणतो.
प्रतीकने २००८ मध्ये 'जाने तू या जाने ना' या रोमँटिक चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो 'धोबी घाट', 'आरक्षण', 'एक दिवाना था', 'बागी २', 'मुल्क', 'छिछोरे' आणि 'मुंबई सागा' या चित्रपटांमध्ये दिसला.
बॉलिवूडमधील आपल्या १३ वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना प्रतीकने सांगितले की, “हा प्रवास रोलरकोस्टर राइडसारखा झाला आहे. बरेच चढ-उतार आले आहेत, परंतु आतापर्यंत बरेच चांगले घडले आहे.''
तो म्हणाला, ''प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा प्रवास असतो. माझा प्रवास खूप घटनाप्रधान आहे. काही लोकांमुळे मी माझ्या आयुष्यातील काही वर्षे गमावली, परंतु आता पश्चात्ताप होत नाही.''
राजकारणी नेता आणि अभिनेता राज बब्बर आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक आपल्या आगामी प्रवासाबद्दल उत्सुक आहे.
हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे आणि मी एक एसी व्यक्ती बनणार आहे जसा मी आहे. हा एक खूप महत्वाचा प्रवास राहिला आहे आणि मी उर्वरित प्रवासाची प्रतीक्षा करीत आहे.
हेही वाचा -तब्बल ८ वर्षांनंतर एकत्र काम करताहेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत!