मुंबई - निर्माते किरण कुमावत आणि हर्षवर्धन गायकवाड निर्मित ‘सिंगल’ हा चित्रपट त्यातील तरुण कलाकारांमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता प्रथमेश परब, अभिनय बेर्डे आणि प्राजक्ता गायकवाड हे तिघे जण प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 'सिंगल' चित्रपटात प्रथमेश परब, अभिनय बेर्डे आणि प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिका साकारणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. याबाबत तिघांनीही बोलताना असे सांगितले की, “या चित्रपटाची उत्सुकता आम्हाला लागून राहिली होती, नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. हा कॉमेडी चित्रपट आहे आणि आम्ही लवकरच प्रेक्षकांना हसवण्यास ‘सिंगल’ घेऊन येणार आहोत.”
Single Movie Shooting Started : प्रथमेश-अभिनय-प्राजक्ता या तिकडीच्या 'सिंगल' चित्रपटाचे शूट झाले सुरु - new marathi movie
प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, प्राजक्ता गायकवाड, अमोल कागणे 'सिंगल' (Single Movie Started ) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी आहे. या चित्रपटाची कथा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारली आहे.