मुंबई (महाराष्ट्र) - बहुप्रतीक्षित प्रभास-पूजा हेगडे यांची भूमिका असलेला राधे श्याम चित्रपट अखेर 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी हा बहुभाषिक चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता. परंतु देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे तो पुढे ढकलला गेला होता.
बुधवारी चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह नवीन रिलीजची तारीख शेअर केली. "चमकदार प्रेमकथेची नवीन रिलीज डेट आहे! #राधेश्याम 11 मार्च रोजी सिनेमागृहात," असे ट्विटमध्ये लिहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
1970 च्या दशकातील कथा असलेल्या राधे श्याम चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास विक्रमादित्यची भूमिका साकारत आहे. त्याच्या प्रेयसीची भूमिका पूजा हेगडे साकारत आहे. या चित्रपटात बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री भाग्यश्री देखील आहे जी प्रभासच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. राधे श्याम तेलगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.
हेही वाचा - Nagraj Manjule Jhund : नागराज मंजुळेचा 'झुंड' अखेर ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार