मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करून कोरोनाविषयी जनजागृती केली होती. या व्हिडिओत त्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना गर्दीत न जाण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्याने आपल्या 'प्यार का पंचनामा' चित्रपटातील हटके स्टाईल वापरली होती. त्याच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कार्तिकचा हा व्हिडिओ पोस्ट करून 'कोरोनाचा पंचनामा' करूया, असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे, की 'ही वेळ 'ज्यादा सावधान' राहण्याची आहे'. तसेच, 'सर्व मिळून कोरोनाचा पंचनामा करूयात', असे कॅप्शन देऊन त्यांनी कार्तिकचा व्हिडिओ शेअर केला आहे.
-
The young actors have something to say..
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Its time to be 'Zyada Savdhan' and do 'Corona ka Punchnama'! #IndiaFightsCorona https://t.co/drEZc4ySZMhttps://t.co/KbQaDg7a5Nhttps://t.co/1RjvF70jJlhttps://t.co/nwIES94SDD
">The young actors have something to say..
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2020
Its time to be 'Zyada Savdhan' and do 'Corona ka Punchnama'! #IndiaFightsCorona https://t.co/drEZc4ySZMhttps://t.co/KbQaDg7a5Nhttps://t.co/1RjvF70jJlhttps://t.co/nwIES94SDDThe young actors have something to say..
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2020
Its time to be 'Zyada Savdhan' and do 'Corona ka Punchnama'! #IndiaFightsCorona https://t.co/drEZc4ySZMhttps://t.co/KbQaDg7a5Nhttps://t.co/1RjvF70jJlhttps://t.co/nwIES94SDD
हेही वाचा -कोरोना व्हायरसवर नंदेश उमप यांचा हा पोवाडा एकदा ऐकाच!
कार्तिक आर्यनच नाही, तर बऱ्याच सेलेब्रिटींनी सोशल मीडियाचा आधार घेत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, काही दिवस घराबाहेर न पडण्याचा देखील सल्ला दिला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील बदलण्यात आल्या आहेत. तसेच, पुढील काही दिवस कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग होणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा -अभिजीत भट्टाचार्यांच्या 'या' सुप्रसिद्ध गाण्यावरून तरुणाने तयार केलं कोरोना सॉन्ग, व्हिडिओ व्हायरल