मुंबई - तैमुर अली खान आणि त्याची आत्तेबहिण इनाया नौमी खेमु यांची लंडनमध्ये भेट झाली. इनायाचे आई-वडील सोहा अली खान आणि कुणाल खेमु यांच्या सहवासात या स्टार किड्सनी आपला वेळ मजेत घालवला.
काही दिवसापूर्वी सोहाने एक फोटो शेअर केला होता. त्यात तैमुरला भेटण्यासाठी इनाया धावत जाताना दिसत होती. कुणालने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये टीम अँड इनि, असे लिहिले होते.
तैमुर आणि इनाया यांना प्राणी खूप आवडतात. मुंबईत ते प्राणी पाहण्यासाठी सतत मागे लागलेले असतात. त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांशीही त्यांचे चांगले जमत असते. या छोट्या बहिण-भावांचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सोहा अलीने त्यांच्यातील नात्याची हळूवार ओळख करुन दिली आहे.
सैफ अली आणि सोहामध्ये ८ वर्षांचे अंतर आहे. तो मोठा भाऊ असल्यामुळे माझी जशी काळजी घेतो तशीच काळजी तैमुर इनायाची घेईल अशी अपेक्षा सोहाने बोलून दाखवली होती. तैमुरहून इनाया एक वर्षांनी लहान आहे. मात्र दोघेही एकमेकांसारखेच दिसतात.