अहमदाबाद - अभिनेत्री पायल रोहतगी. मनोरंजन क्षेत्रातील आणखी एक वादग्रस्त नाव. नेहमी कुरापती करुन वाद ओढवणारी, प्रसिध्दीच्या झोतात राहणारी, आक्षेपार्ह कॉमेंट्स करुन कधी ट्रोल होणाऱ्या पायल रोहतगीच्या हातात बेड्या पडल्या आहेत. यावेळचा मामला शिवीगाळ करणे आणि धमकी देण्याचा आहे.
पायल रोहतगी अहमदाबादमध्ये एका सोसायटीमध्ये राहते. इथे राहणाऱ्या शेजाऱ्यांसोबत तिचे अधून मधून खटके उडत असतात. २० जून रोजी सोसायटीची मिटींग होती. सोसायटीची मेंबर नसतानाही पायल यावेळी उपस्थित होती. तिला बोलण्यास मज्जाव करण्यात आला तेव्हा मॅडम शिव्या द्यायला लागल्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पायल अटक होण्याची ही पहिली वेळ नाही
अभिनेत्री पायल रोहतगी यापूर्वीही एकदा तुरुंगाची हवा खाऊन आली आहे. तिला राजस्थानच्या बूंदी पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर राजस्थान न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता.
वादग्रस्त पायल
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पायल रोहतगीने २१ सप्टेंबर २०१९ सोशल मीडियावर एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिने स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. पायलाच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती.
पायलने अंगावर घेतलेले वाद
अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या वक्तव्यांमुळे बर्याचदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या ट्वीटमुळे ती बऱ्याचदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहते. आतापर्यंत तिला अनेकदा ट्रोलचा सामना करावा लागतो. सती प्रथेचे समर्थन करणे, नोबेल पुरस्कार विजेते मलाला यूसुफजईला शिवीगाळ करणे, वीर शिवाजी महाराजांच्या जातीबद्दल प्रश्न विचारणे, कलाम ३७० बद्दल वादग्रस्त विधान करणे, फूड अॅप झोमॅटोला धर्मनिरपेक्ष म्हणून संबोधणे अशा अनेक वादांमध्ये पायलचे नाव गुंतले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सिनेमा कारकिर्द यथातथाच
पायलच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे तर तिचे करिअर काही खास राहिलेले नाही. अभिनयामुळे ती फारशी चर्चेत राहिली नाही. वो ये क्या हो रहा है, रिफ्यूजी, तुमसे मिलकर, रक्त, तौबा तौबा, 36 चाइना टाउन, ढोल, अगली और पगली, दिल कबड्डी यासारख्या सिनेमातून ती झळकली आहे. याशिवाय तिने टीव्हीमध्येही काम केले आहे. ती बिग बॉसमध्ये दिसली होती, तिथून ती थोडी चर्चेत आली होती. त्यानंतर ती 'फियर फॅक्टर इंडिया २' मध्ये दिसली.
हेही वाचा - शबाना आझमी यांनी ऑनलाइन मागवली होती दारू, पैसे भरुनही झाली फसवणूक