ETV Bharat / sitara

सुरुवातीची १७ वर्षे 'त्याच्या'शिवाय घालवली आणि आता त्याच्याविना एक गोष्टही होईना - परिणीती - सिनेमा

परिणीतीने आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्या हातात मोबाईल आहे. या फोटोला परिणीतीनं कॅप्शनही दिलं आहे. सध्या माझा प्रत्येक दिवस असाच जात आहे. आयुष्याची सुरुवातीची १७ वर्षे मोबाईलशिवाय घालवली आणि आता याच्याशिवाय एकही गोष्ट करू शकत नाही.

स्वतःच्याच या सवयीनं परिणीती हैराण
author img

By

Published : Aug 1, 2019, 1:44 PM IST

मुंबई - सोशल मीडियामुळे तरुणाईमधील मोबाईलचा वाढणारा वापर हा एक प्रकारे गंभीर विषय होत चालला आहे. दिवसातील कित्येक तास तरुण-तरुणी मोबाईलमध्येच घालवताना दिसतात. आता याच गोष्टीने परिणीती चोप्राही हैराण झाली आहे.

परिणीतीने आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्या हातात मोबाईल आहे. या फोटोला परिणीतीनं कॅप्शनही दिलं आहे. सध्या माझा प्रत्येक दिवस असाच जात आहे. आयुष्याची सुरुवातीची १७ वर्षे मोबाईलशिवाय घालवली आणि आता याच्याशिवाय एकही गोष्ट करू शकत नाही. कधीकधी खरंच ते साधं आयुष्य खूप मिस करते, असं परिणीतीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टला तिनं कलियुग असं हॅश्टॅग दिलं आहे. दरम्यान परिणीती लवकरच 'जबरिया जोडी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्राही झळकणार आहे. बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित हा सिनेमा ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.