ETV Bharat / sitara

पानिपत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली, 6 डिसेंबरला सिनेमा होणार रिलीज

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत या सिनेमाचे दुसरे पोस्टर आता समोर आले आहे. त्यासोबतच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील ठरली असून येत्या 6 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पानिपत रिलीज ठरलं
author img

By

Published : Nov 1, 2019, 1:43 PM IST

भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित पानिपत या सिनेमाचं दुसरं पोस्टर आता समोर आलं आहे. त्यासोबतच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील ठरली असून येत्या 6 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय सिनेमाची निर्मिती करणाऱ्या रिलायन्स एंटरटेनमेंटने घेतला आहे.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमात अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाचं चित्रीकरण जवळपास पूर्ण झालेलं आहे. मराठा साम्राज्याचा अस्त ज्या युद्धानंतर सुरू झाला त्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे.

सदाशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाण बादशहा मोहम्मद शहा अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धात मराठा साम्राज्याच मोठं नुकसान झालं होतं. जवळपास 1 लाख मराठे या युद्धात मारले गेले. मात्र, त्यासोबतच देशाच्या राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळाली. यावर या सिनेमाद्वारे भाष्य करण्यात येणार आहे.

रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेलटकर आणि सुनीता गोवारीकर यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. सुरुवातीपासूनच या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. ऍक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांचीही जोड या सिनेमाला मिळणार आहे, हे काही वेगळं सांगायला नकोच. त्यामुळे आता 6 डिसेंबरची वाट सगळेच आतुरतेने पाहतील यात काहीच शंका नाही.

Intro:भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित पानिपत या सिनेमाचं दुसरं पोस्टर आता समोर आलं आहे. त्यासोबतच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखिल ठरली असून येत्या 6 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय सिनेमाची निर्मिती करणाऱ्या रिलायन्स एंटरटेनमेंटने घेतला आहे.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमात अर्जुन कपूर, कृती सनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाच चित्रीकरण जवळपास पूर्ण झालेलं आहे.
मराठा साम्राज्याचा असत ज्या युद्धानंतर सुरू झाला त्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे.

सदाशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाण बादशहा मोहम्मद शहा अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धात मराठा साम्राज्याच मोठं नुकसान झालं होतं. जवळपास 1 लाख मराठे या युद्धात मारले गेले. मात्र त्यासोबतच देशाच्या राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळाली. यावर या सिनेमाद्वारे भाष्य करण्यात येणार आहे.

रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेलटकर आणि सुनीता गोवारीकर यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. सुरुवातीपासूनच या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. ऍक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांचं यांचीही जोड या सिनेमाला मिळणार आहे हे काही वेगळं सांगायला नकोच, त्यामुळे आता 6 डिसेंबरची वाट सगळेच आतुरतेने पाहतील यात काहिच शंका नाही. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.