मुंबई - दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीद्वारा दिग्दर्शित ‘पंगा’ चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट एका कब्बडीपटूच्या जीवनावर आधारित असणार आहे. दीड वर्षापूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. अशात आता या सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं आहे.
अश्विनी तिवारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच तिने टीमचे आभार मानत भावूक पोस्टही लिहिली आहे. प्रत्येक सकाळी सूर्य उगवतो आणि आपण कधीच हे विचारत नाही, की तो का उगवला आणि का चमकतोय. हे सर्व आपोआप घडत असतं. माझी पंगा चित्रपटाची टीमही या सूर्याप्रमाणेच आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
एक असा सूर्य जो आपल्या प्रकाशाने सर्वत्र आशेचे किरण पसरवतो, जेव्हा सगळं काही अशक्य वाटत असतं. चित्रपट बनवणे ही सोपी गोष्ट नाही. तसेच ते तत्काळ पूर्णही होऊ शकत नाही, यासाठी संयम असणं गरजेचं आहे, कारण रस्त्यात खूप सारे अडथळे येत असतात. पंगा चित्रपटाचा हा दीड वर्षाचा प्रवासही आमच्यासाठी विजयाचा आणि अडथळ्यांचा होता. या प्रवासात नेहमी मला साथ देण्यासाठी धन्यवाद. या प्रवासात पंगाची संपूर्ण फॅमिली एकत्र हसली आणि रडली तसंच प्रत्येक दिवस सार्थकी लावला, असं अश्विनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान या चित्रपटात कंगनासह जस्सी गिल, रिचा चड्ढा, पंकज त्रिपाठी आणि नीना त्रिपाठी हे कलाकार देखील झळकणार आहेत. हा चित्रपट २४ जानेवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.