ETV Bharat / sitara

ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे अश्लिलता पसरवणारी जागा - कंगना रणौत

author img

By

Published : Oct 22, 2020, 8:40 PM IST

ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे अश्लिलता पसरवणारी जागा असल्याचे कंगना रणौतने म्हटले आहे. याबात आपले विचार मांडण्यासाठी तिने मोठी पोस्ट लिहिली असून तिने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर इरॉसला टॅग केले आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर निशाणा साधला असून हे म्हणजे अश्लिलता पसरवणारी जागा असल्याचे म्हटले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने इरॉस नाऊने पोस्ट शेअर केल्यानंतर रणवीर सिंग, सलमान आणि कॅटरिनाचे मीम्स तयार झाले. त्या पार्श्वभूमीवर कंगनाने ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • Even on international streaming platforms the nature of the content is sensational we need to manufacture overtly sexual, deeply gruesome brutal, violent content, essentially to arouse the viewer’s sexual appetite, very difficult to get any other content cleared by their teams.

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) October 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इरॉसला टॅग करून आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर कंगनाने लिहिलंय, ''आपल्या समुदायाला थिएटरमध्ये दाखवण्यालायक चित्रपटांचे संरक्षण केले पाहिजे. व्यक्तीगत पातळीवर दाखवण्यासाठी आशय सामुग्रीला अश्लिल बनवणे आणि कलेचे प्रदर्शन करणे सोपे झाले आहे. असे असले तरी याच्या तुलनेत प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करणे खूप कठीण झाले आहे. हे सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म दुसरे काही नाही तर पॉर्न हब बनल्या आहेत. ही लज्जास्पद बाब आहे.''

एका वेगळ्या ट्वीटमध्ये ती लिहिते, "आणि हा फक्त स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा दोष नाही, जेव्हा तुम्ही एकटे बसून, कानात हेडफोन घालून काही पाहात असाल तर तुम्हाला त्वरित समाधान हवे असते. चित्रपट पूर्ण कुटुंब, मुले, शेजार पाजारी यांच्यासह पाहिला पाहिजे. मूळ स्वरुपात हा सामुदायिक अनुभव असायला हवा.''

ती पुढे लिहिते, ''यामुळे आपली सतर्कता वाढते. जेव्हा आपल्याला माहिती असते की आपण जे पाहात आहोत ते दुसरेही पाहात आहेत, आपणही त्याच्यासारखे बनायचा प्रयत्न करतो. आपण दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःला दाखवत असतो. आपण गोष्टींसाठी खूप सजग होत असतो. आपले डोके, भावना आणि आपल्या अंतरात्म्याला लगाम घालणे आवश्यक असते.''

कंगनाच्या या गोष्टीला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडिया यूझर्सनीदेखील कबूल केले आहे की या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्ममुळे भारतीय लोकांची संस्कृती आणि भावना दुखावल्या जात आहेत.

सोशल मीडियावर लोकांना एकजूट होताना पाहून इरॉसने ही पोस्ट हटवली असून गुरुवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर माफीनामाही जारी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.