ETV Bharat / sitara

ठरलं...अनन्या पांडेसोबत विजय देवराकोंडाची झळकणार जोडी - ONFIRMED... AnanyaPanday opposite Vijay Deverakonda... The film - not titled yet

अनन्या पांडे आणि विजय देवराकोंडा आगामी चित्रपटात झळकणार हे आता निश्चित झाले आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.

AnanyaPanday opposite Vijay Deverakonda
अनन्या पांडेसोबत विजय देवराकोंडा
author img

By

Published : Feb 20, 2020, 2:09 PM IST

मुंबई - अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवराकोंडा जरी बॉलिवूडसाठी नवीन असले तरी त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. विजयने तर अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलेले नाही. परंतु 'कबीर सिंग'मुळे विजय देवराकोंडा चर्चेत आला. 'अर्जुन रेड्डी' या तेलगू सिनेमाचा 'कबीर सिंग' हा हिंदी रिमेक होता. 'अर्जुन रेड्डी'मध्ये विजयने साकारलेली भूमिका त्याच्या हिंदीच्या तमाम चाहत्यांनी पाहिली आणि त्याची प्रतीक्षा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. अखेर हा दिवस आता उजाडला आहे.

निर्माता जगन्नाथ पुरी, चार्मी कौर, करण जोहर आणि अपूर्वा मेहता यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली असून यात विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे याची जोडी रुपेरी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार असल्याचे संकेत दिलेत.

अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. 'स्टुडन्ट ऑफ द इयर २' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 'पती पत्नी ओर वो' या सिनेमातून तिने चाहत्यांचे प्रेम मिळवले.

अनन्या पांडे आणि विजय देवराकोंडा आगामी चित्रपटात झळकणार हे आता निश्चित झाले आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. मात्र दोगांच्याही चाहत्यांसाठी हा चित्रपट आनंदाची पर्वणी ठरू शकतो. हा चित्रपट हिंदीसह सर्व दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.