मुंबई - अभिनेता इराफान खानचा मुलगा बाबील याने नववर्षाच्या निमित्ताने वडिलांचे स्मरण केले आहे. बाप लेकांमधील घट्ट नाते दाखवणारे दोन फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इन्स्टाग्रामवर बाबीलने हे दोन जुने फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये दोघेबी बाप-लेक पलंगावर थकून भागून पडलेले दिसत आहेत. दुसरा फोटो हसरा आहे. यात दोघांमधील एक सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. तुझ्याशिवाय कोणी नाही, अजूनही तुझी सोबत आहे असे म्हणत त्याने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यापूर्वी, २०२१ मध्ये रिलीज होणाऱया 'द सॉन्ग ऑफ द स्कॉर्पियन्स' नावाच्या इरफान खानच्या शेवटच्या चित्रपटाविषयीही बाबीलने शेअर केले होते.
हेही वाचा - स्वागत २०२१ : बॉलिवूडचे हे चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर धमाका
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम अभिनेता इरफान खान यांचे दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाशी झुंज देताना यावर्षी एप्रिलमध्ये मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले.
हेही वाचा - २०२० : वादग्रस्त बॉलिवूडकरांचे सोशल मीडियावर रंगलेले वाद