ETV Bharat / sitara

लग्नाच्या वाढदिवशी सोनमने शेअर केला पहिल्यांदा क्लिक केलेला फोटो - लग्नाच्या वाढदिवशी सोनमने शेअर केला पहिल्यांदा क्लिक केलेला फोटो

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहूजा आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करीत आहेत. या खास प्रसंगी सोनमने आनंदबरोबर-वर्षाचा जुना फोटो शेअर केला आहे. तसेच दोघांनी एकमेकांवर किती प्रेम आहे हेही सांगितले आहे.

Sonam Kapoor
सोनम कपूर आणि आनंद आहूजा
author img

By

Published : May 8, 2020, 1:34 PM IST

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहूजाच्या लग्नाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. लॉकडाऊनमुळे हे जोडपे घरी वाढदिवस साजरा करीत आहे.

या खास प्रसंगी सोनम कपूरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर आनंदसोबत ४ वर्षापूर्वीचा एक फोटो शेअर करीत आपल्या ह्रदयातील गोष्ट लिहिली आहे.

सोनमने तिच्या पतीसाठी लिहिले, ''हे आमच्या दोघांचे पहिले चित्र आहे. 4 वर्षांपूर्वी मी एका व्यक्तीस भेटलो जो जटिल योगाला अगदी सहज सोपा बनवित असे. जो बिझनेसच्या गोष्टी अगदी सहज करीत होता. असे असताना मला तो अतिशय शांत आणि सुंदर वाटला.''

सोनमने पुढे लिहिलंय की, ''ती आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करते आणि तिला हेदेखील माहिती आहे की तोही खूप प्रेम करतो. आनंद आहुजा हा कपड्याच्या ब्रँडचा मालक आहे आणि सह संस्थापकही आहे.''

सोनम आणि आनंद यांची मैत्री आणि प्रेमकथा फेसबुक आणि स्नॅपचॅटपासून सुरू झाली होती. दोन महिन्यानंतर दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या भेटीतच सोनमने ओळखले होते की, आनंदसोबत आयुष्य घालवायचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.