मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तिने जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील वैष्णोदेवीच्या पवित्र गुहेला भेट दिली. कंगनाने तिच्या वैष्णोदेवी भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगनाच्या सोबत तिची बहीण रंगोली चंदेल देखील होती. कंगनाला सोशल मीडियावरुन भरपूर शुभेच्छा मिळत आहेत. अनेकांची तिचे फोटो स्टेटसमध्ये ठेवले आहेत. बॉलिवूडसह दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतूनही तिच्यावर शुभेच्चांचा वर्षाव सुरू आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इंस्टाग्राम हँडलवर फोटोंची स्ट्रिंग शेअर करत कंगनाने तिच्या शुभचिंतकांचे प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार मानले. कंगनाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "आज माझ्या वाढदिवसानिमित्त.... भगवती श्री वैष्णोदेवीजींना भेट दिली... देवीचे आणि माझ्या पालकांचे आशीर्वाद या वर्षाची वाट पाहत आहेत. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी सर्वांचे आभार." वैष्णोदेवी भेटी दरम्यानच्या फोटोंमध्ये कंगना रंगीबेरंगी एथनिक पोशाख परिधान केलेली दिसत आहे.
कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने देखील तिच्या इंस्टाग्राम हँडलवर कंगनाच्या वाढदिवसाची नोट लिहिली. कंगनासोबतचा एक सेल्फी शेअर करताना तिने बहिणी ही आपल्या आयुष्यात कशी प्रेरणादायी आहे याबद्दल लिहिले व तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. रंगोली चंदेलने लिहिलंय, "प्रिय बहिण, तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस. तुझे प्रेम आणि दयाळपण शुध्द आहे. माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा." रंगोली कंगनाची केवळ बहिण नाही तर तिच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ती प्रबंधक म्हणून सहभागी असते.
कामाच्या आघाडीवर, कंगना सध्या OTT रिअॅलिटी शो लॉक अप होस्ट करत आहे. ती लवकरच 'तेजस', 'धाकड', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा', 'इमर्जन्सी' आणि 'द इन्कारनेशन: सीता' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मणिकर्णिका फिल्म्स या तिच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत डार्क कॉमेडी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटातून निर्माती म्हणूनही ती पदार्पण करणार आहे.
हेही वाचा - Madhuri Dixit New Rented Home : माधुरी दिक्षीतने वरळीत घेतले नवीन घर; भाडे ऐकून व्हाल थक्क