ETV Bharat / sitara

Nusrat Bharuch uses Pregnant Body Suit : 'छोरी'साठी नुसरत भरुचाने शूटिंगच्या २५ दिवस आधीपासूनच वापरला ‘प्रेग्नंट बॉडी सूट’! - नुसरत भरुचाने वापरला ‘प्रेग्नंट बॉडी सूट’

‘छोरी' चित्रपटातील गरोदर बाईची भूमिका साकारण्यासाठी नुसरत भरुचाने (Nusrat Bharucha) शूटिंगच्या २५ दिवस आधीपासूनच ‘प्रेग्नंट बॉडी सूट’ (Pregnant body suit)घालण्यास सुरुवात केली होती. गर्भवती महिलेच्या भूमिकेत पूर्णतः उतरण्यासाठी आणि शूटिंगदरम्यान सेटवर उत्तम काम देण्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता.

नुसरत भरुचाने वापरला ‘प्रेग्नंट बॉडी सूट’

author img

By

Published : Nov 18, 2021, 8:45 PM IST

मराठीमध्ये पूजा सावंत (Pooja Sawant)अभिनित ‘लपाछपी’ (Marathi movie Lapachapi) याची हिंदी आवृत्ती येतेय आणि दोघांचेही दिग्दर्शन केलंय विशाल फुरिया याने. हिंदीत या चित्रपटाचे नाव आहे, ‘छोरी’ (Choori) आणि यातील प्रमुख भूमिका साकारतेय अभिनेत्री नुसरत भरुचा. ‘छोरी' चित्रपटातील गरोदर बाईची भूमिका साकारण्यासाठी नुसरत भरुचाने (Nusrat Bharucha) शूटिंगच्या २५ दिवस आधीपासूनच ‘प्रेग्नंट बॉडी सूट’ (Pregnant body suit)घालण्यास सुरुवात केली होती. गर्भवती महिलेच्या भूमिकेत पूर्णतः उतरण्यासाठी आणि शूटिंगदरम्यान सेटवर उत्तम काम देण्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

नुसरत भरुचा (Nusrat Bharucha)'छोरी' चित्रपटातून प्रेक्षकांना एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून तिला एका पूर्णपणे नवीन अवतारात गर्भवती महिलेची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. या व्यक्तिरेखेच्या सरावासाठी शूटिंगच्या खूप आधीपासून नुसरतने प्रेग्नंट बॉडी सूट घालायला सुरुवात केली होती. नुसरतला साक्षीच्या भूमिकेत पाहण्यासाठी आणि शहरातून एका निर्जन खेड्यापर्यंतचा तिचा प्रवास अनुभवण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत जिथे तिला भुताटकीच्या गोष्टींचा अनुभव येतो. नुसरतच्या या पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवताराद्वारे तिचे अष्टपैलुत्व दाखवले आहे जे प्रेक्षकांना निश्चितच त्यांच्या खुर्च्यांवर खिळवून ठेवेल.

गर्भधारणेच्या आधुनिक पैलूबद्दल आपले विचार शेअर करताना नुसरत म्हणाली,* "आम्ही एक अतिशय वास्तववादी सिनेमा करत असल्याने, सर्व काही प्रेक्षकांना स्पून फीड करण्याची गरज नाही. हे खूप सखोल असणे आवश्यक आहे. प्रेक्षकांना टिपिकल पद्धतीने न सांगता की तुम्ही खरोखर गर्भवती आहात, त्यांना यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार करणे महत्त्वाचे होते. झोपताना किंवा बाथरूमला जाताना किंवा मिड-स्क्वाट्स करताना बॉडी सूटशी जुळवून घेणं थोडं कठीण असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्त्रीची गर्भधारणा वेगळी असते आणि कधी कधी बॉडी सूट आपल्यासोबत सतत कॅरी करणे कठीण असतं."

नुसरत पुढे म्हणाली, "मी खऱ्या आयुष्यात इतक्या लवकर गरोदर होणार नाही म्हणून मी एक बॉडीसूट बनवला, जेणेकरून प्रसूती असणाऱ्या स्त्रिया कोणत्या परिस्थितीतून जातात हे मला कळेल. मी २०-२५ दिवस आधीपासून तो परिधान करायला सुरुवात केली होती. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि खाणे, झोपणे, बाथरूममध्ये जाणे, फिरणे आणि त्यात येणारी बंधने समजून घेणे ही सर्व मी प्रामाणिकपणे केले. गरोदरपणाशी संबंधित सर्व गोष्टी स्वतः समजून घेण्यासाठी आणि नंतर त्यांना अधिक वास्तववादी पैलूंसह अभिनयात उतरवण्यासाठी, ज्याच्याशी प्रेक्षकांना जोडता येईल, यासाठी मला स्वतःला पूर्णपणे यात गुंतवून घ्यावे लागले. हा माझ्यासाठी प्रॉप नसला तरी माझा भूमिकेसाठी तयारीचा एक भाग होता. पण मला याची इतकी सवय झाली होती की जेव्हा शूट सुरू होते, तेव्हा मला रिहर्सल दरम्यान आराम करताना बॉडी सूटमध्ये अधिक आरामदायक वाटत होते."

विशाल फुरिया दिग्दर्शित आणि टी-सीरीज़, क्रिप्ट टीवी आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, छोरी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - Iffi 2021 Goa : हेमा मालिनी व प्रसून जोशींचा 2021 आयफा पुरस्कार सोहळ्यात होणार सन्मान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.