ETV Bharat / sitara

Nora Fatehi Prosecution Witness : नोरा फतेही ठग सुकेश चंद्रशेखर विरुद्ध होणार फिर्यादी साक्षीदार - Nora Fatehi Prosecution Witness

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही 2017 पासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर ( Conman Sukesh Chandrashekar Case ) विरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात साक्षीदार ( Nora Fatehi Prosecution Witness ) होणार आहे.

नोरा फतेहीचा इन्स्टाग्रामवरील फोटो
नोरा फतेहीचा इन्स्टाग्रामवरील फोटो
author img

By

Published : Dec 22, 2021, 7:03 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही 2017 पासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखर ( Conman Sukesh Chandrashekar Case ) विरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात फिर्यादीची साक्षीदार ( Nora Fatehi Prosecution Witness ) होणार आहे. ठग सुकेशची पत्नी लीना ( Sukesh wife Leena ) हिने चेन्नईत एका कार्यक्रमाला जाण्यासाठी मोबदला म्हणून नोराला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिला होता. आता या संपूर्ण प्रकरणात सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात नोरा फतेही साक्षीदार म्हणून हजर होणार आहे.

नोराने ईडीला काय सांगितले?

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ईडीने अलीकडेच नोरा फतेहीची कसून चौकशी केली होती. यादरम्यान नोराने आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. नोराने सांगितले होते की, सुकेशने एका कार्यक्रमाला जाण्याच्या बदल्यात तिला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिला होता. आता नोराला या खटल्यात सरकारी साक्षीदार म्हणून हजर केले जाणार आहे.

ईडी जप्त करणार नोराला दिलेल्या गिफ्ट्स

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशची पत्नी लीना हिने अभिनेत्री नोरा फतेहीला भेट दिलेली बीएमडब्ल्यू कारही ईडी जप्त करणार आहे. सूत्रांनी सांगितले की, 'जॅकलिनने आम्हाला सांगितले की तिला सुकेशच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती नाही आणि अभिनेत्री आम्हाला सुकेशने दिलेल्या सर्व भेटवस्तू जप्त करण्यात मदत करत आहे.' ही प्रक्रिया पीएमएलएच्या कलम 5 अंतर्गत पूर्ण केली जाईल.

सूत्रांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे की ईडी लवकरच दोन्ही अभिनेत्रींना दिलेल्या भेटवस्तू जप्त करणार आहे, परंतु आरोपपत्र दाखल झाल्यामुळे कामाला विलंब झाला. सूत्रांनी सांगितले की, 'आम्ही पिंकी इराणी नावाच्या महिलेला अटक केली आहे, जिचा आरोपपत्र तयार करण्यात आणि जबाब घेण्यात वेळ वाया गेला. यापूर्वी ईडीच्या चौकशीत जॅकलिनने सांगितले होते की, तिच्या बहिणीने सुकेशकडून 1.50 लाख डॉलरचे कर्ज घेतले होते.

सुकेश चंद्रशेखर याने ईडीला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या निवेदनात, त्याने जॅकलिनच्या खात्यात 1.80 लाख डॉलर ट्रान्सफर केल्याचा खुलासा केला होता. त्याने अभिनेत्री जॅकलिनला महिला सुपरहिरो म्हणून दाखवण्याचे वचन दिले होते.

काय आहे 200 कोटींची फसवणूक प्रकरण?

सुकेश चंद्रशेखर नावाचा ठग 2017 पासून राजधानी दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. याने तुरुंगात असताना प्रसिद्ध औषध कंपनी रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकाच्या पत्नीची २०० कोटी रुपयांची फसवणूक केली होती. प्रकरण असे होते की फार्मा कंपनीचे माजी प्रवर्तक तुरुंगात होते, त्यांना तुरुंगातून बाहेर आणण्याच्या बदल्यात सुकेशने पत्नी अदिती सिंगला कंपनीचा होम सेक्रेटरी असल्याचे सांगत फसवले होते. सुकेशने गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती दिली आणि त्यानंतर 200 कोटी रुपयांची मागणी केली. सुकेशकडे आल्यानंतर अदिती सिंहने 200 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते.

हेही वाचा - Sequel Of Rowdy Rathod : केव्ही विजयेंद्र प्रसाद लिखीत अक्षय कुमारच्या 'राउडी राठोड 2'ची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.