मुंबई - बॉलिवूडची आयटम नंबर डान्स गर्ल नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नोराचा सर्वोत्तम डान्स आणि किलर मूव्ह्स तिच्या चाहत्यांना आकर्षित करतात. आता नोराच्या नृत्याची जादू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही दिसणार आहे. खरंतर, नोरा फतेही बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनाससोबत अबू धाबी येथे एका आगामी कार्यक्रमात स्टेज शेअर करताना दिसणार आहे.

आपल्या माहिती करता सांगायचे तर , विडकॉन (VidCon) कंपनी 3 डिसेंबरला अबू धाबीमध्ये एक कार्यक्रम करणार आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात नोरा तिच्या चास्टबस्टर्स (Chastbusters) गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. 3 डिसेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नोराने पंजाबी गायक हार्डी संधूसोबत अनेक डान्स नंबरची रिहर्सल केल्याचे सांगितले जात आहे. त्याच वेळी, प्रियांका चोप्राचा पती आणि अमेरिकन गायक निक जोनास देखील या शोचा एक भाग असेल.

यापूर्वी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉलिवूडचे प्रतिनिधित्व केले आहे. नोराने पॅरिसमधील ल'ओलंपिया ब्रूनो कोक्वेट्रिक्स ( L'Olympia Bruno Coquetrix) येथे अरबी आणि भारतीय नृत्य आणि गायन सादर केले. नोरा फतेही असा दावा करते की ती मुंबई चित्रपटसृष्टीतील एकमेव सेलिब्रिटी आहे जिने या प्रतिष्ठित ठिकाणी ऑलिम्पियामध्ये आपला परफॉर्मन्स दिला.
नोरा फतेही या वर्षी 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' आणि जॉन अब्राहम स्टारर 'सत्यमेव जयते 2' या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली होती. नोराने अजय देवगण स्टारर 'भुज' या चित्रपटात काम केले होते. त्याचवेळी 'सत्यमेव जयते 2'मधील 'कुसु कुसू' या विशेष गाण्यावर तिने सादर केलेले नृत्य हिट ठरले.
हेही वाचा - Gadar 2: सनी देओल आणि अमिषाची जोडी पुन्हा झळकणार, 'गदर 2'च्या सेटवरील फोटो व्हायरल